मालिकेला अचानक ब्रेक, पण जोडी कायम! 'पारू' नंतर अहिल्यादेवी-श्रीकांत पुन्हा एकत्र
- Published by:Minal Gurav
Last Updated:
पारू मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मालिकेतील फेमस जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
पारू या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक ही जोडी नव्या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे जनक आणि प्रसिद्ध 'अॅड गुरु' भरत दाभोळकर आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत.
advertisement
advertisement
अभिनेते विजय पटवर्धन म्हणाले, "कॅरी ऑन SPYगिरी हे माझं 58 वं व्यावसायिक नाटक. या नाटकातून मी नि मुग्धा कर्णिक पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहोत. मुळात म'ग्धा आणि माझी गट्टी 'घोळात घोळ' या नाटकापासून जमली. आम्हाला एकमेकांच्या कामाच्या पद्धतीची आणि 'टायमिंग'ची अचूक कल्पना असल्याने, 'कॅरी ऑन SPYगिरी' मध्येही प्रेक्षकांना आमची तीच सहज केमिस्ट्री पाहायला मिळेल."
advertisement
"मालिका आणि नाटकात जमीन-अस्मानचा फरक असतो; नाटकाचा प्रेक्षक पूर्णपणे तुमच्या समोर असतो, त्याला दोन तास खिळवून ठेवणं हे नटाचं खरं कसब असतं. आजच्या टेन्शनने भरलेल्या आयुष्यात विनोदी नाटक हा सर्वोत्तम विरंगुळा आहे. 'कॅरी ऑन SPYगिरी' नाटकात भरत सरांसोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट असून त्यांच्या 'ब्लॅक ह्युमर'ची शैली प्रेक्षकांचा नक्कीच हशा वसूल करेल."
advertisement
advertisement
"मालिकेतली आमची पात्रं आणि या नाटकातली पात्रं एकमेकांच्या पूर्णपणे टोकाची आहेत. या नाटकाला दाभोळकरी 'पॅटर्न' मिळाल्यामुळे हे नाटक अजून खुलून निघालं आहे. भरत सरांची काम करण्याची पद्धत अत्यंत अभ्यासू असून त्यांच्या लिखाणातील 'राजकीय भाष्य' नाटकाला एक वेगळीच उंची देतं. नाटकाच्या तालमींदरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे."
advertisement
या नाटकात अभिनेते विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक यांच्याबरोबर अभिनेते मोहन आझाद, विजय पटवर्धन, मुग्धा कर्णिक, राहुल पेठे, आकाश भडसावळे, सुयश पुरोहित, गीतांजली गणगे, गौरव निमकर आणि स्वतः भरत दाभोळकर अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. 10 एप्रिल 2026 रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे आणि तर 18 एप्रिल 2026 रोजी बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत.










