advertisement

Shani Nakshatra: एकामागून एक अडचणी आता पिच्छा सोडणार; शनिचा नक्षत्र बदल 3 राशींना लकी, मोठी खुशखबर

Last Updated:

Shani Astrology: रेवती नक्षत्राचा स्वामी बुध आहे, त्यामुळे या काळात बुद्धी, नियोजन आणि संवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये विशेष परिणाम पाहायला मिळू शकतात. शनीचा हा बदल संयम राखणाऱ्या आणि मेहनत करणाऱ्यांसाठी फलदायी ठरू शकतो.

News18
News18
मुंबई : शनि, मंगळाच्या स्थितीला विशेष मानले जाते, ज्योतिषशास्त्रामध्ये शनीची चाल अतिशय महत्त्वाची मानली जाते. शनीचा प्रभाव केवळ राशी परिवर्तनापुरता मर्यादित नसून, नक्षत्र परिवर्तन देखील जीवनावर मोठा परिणाम करते. मे 2026 मध्ये शनि रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ही स्थिती साधारण 146 दिवसांपर्यंत म्हणजेच ऑक्टोबर 2026 पर्यंत राहील. याचा परिणाम सर्व राशींवर होईल, परंतु 3 राशींसाठी हा काळ विशेषतः अनुकूल मानला जात आहे.
रेवती नक्षत्रात शनीचा प्रभाव
17 मे 2026 रोजी शनि ग्रह रेवती नक्षत्रात गोचर करणार आहे आणि 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत याच नक्षत्रात राहील. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध आहे, त्यामुळे या काळात बुद्धी, नियोजन आणि संवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये विशेष परिणाम पाहायला मिळू शकतात. शनीचा हा बदल संयम राखणाऱ्या आणि मेहनत करणाऱ्यांसाठी फलदायी ठरू शकतो. बऱ्याच काळापासून रेंगाळलेल्या कामांमध्ये हळूहळू प्रगती होणे शक्य आहे.
advertisement
सिंह राशीच्या लोकांना महत्त्वाच्या कामात सहकार्य मिळेल, यशाचे योग आहेत. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ मित्र आणि कुटुंबाची साथ मिळवून देणारा असेल. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा करार फायदेशीर ठरू शकतो. आरोग्यात सुधारणा होईल आणि मानसिक शांतता लाभेल. धार्मिक तसेच आध्यात्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढण्याचे संकेत आहेत.
advertisement
धनू राशीच्या लोकांना करिअरमध्ये मिळतील नवीन संधी, धनू राशीच्या लोकांसाठी ही वेळ पुढे जाण्याची आहे. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतील. या काळात तुम्हाला नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या भविष्यात लाभदायक ठरतील. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
मकर राशीला मेहनतीचे फळ मिळेल, मकर राशीच्या लोकांना दीर्घकाळापासून सुरू असलेल्या त्रासातून दिलासा मिळू शकतो. पदोन्नती किंवा नवीन जबाबदारीची संधी निर्माण होईल. करिअरच्या बाबतीत तुमच्या आयुष्यात स्थिरता येईल. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. प्रवासाचे योगही जुळून येत आहेत, जे भविष्यासाठी फायदेशीर ठरतील.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shani Nakshatra: एकामागून एक अडचणी आता पिच्छा सोडणार; शनिचा नक्षत्र बदल 3 राशींना लकी, मोठी खुशखबर
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement