advertisement

पावसाने घेतली पुणे पालिकेची 'परीक्षा', ढगफुटी की आणखी काही? महापौरांनी स्पष्ट सांगितलं!

Last Updated:

आज दुपारनंतर अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या काही वेळात झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून रस्ते तुंबले, तर नागरिकांना मोठ्या कसरतीने प्रवास करावा लागला.

+
News18

News18

पुणे : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर हानी घडवून आणली आहे. आज दुपारनंतर अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या काही वेळात झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून रस्ते तुंबले, तर नागरिकांना मोठ्या कसरतीने प्रवास करावा लागला. शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच उपनगरांमध्येही पाण्याचा निचरा न झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागले, तर पादचाऱ्यांचीही मोठी गैरसोय झाली. या पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली असून काही भागांमध्ये वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
सिंहगड रोड परिसरासह विविध भागांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर दिसून आली. येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. घरातील साहित्य भिजल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतला.
महापौरांनी सिंहगड क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्याचे आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र यंदा पावसाने अपेक्षेपेक्षा लवकर हजेरी लावल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे क्लाऊड बर्स्ट सारखी परिस्थिती निर्माण झाली असून पाण्याचा निचरा न झाल्याने शहर तुंबले.
advertisement
पावसाचे वाढते प्रमाण आणि विद्यमान ड्रेनेज व्यवस्थेची मर्यादित क्षमता यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व लाईन्स तत्काळ विस्तारित करणे शक्य नसले तरी ज्या ठिकाणी नव्याने कामे सुरू आहेत, त्या भागांमध्ये योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असं महापौर मंजुषा नागपुरे सांगितलं.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, खडकवासला येथे 104.02 मिमी पाऊस झाला आहे. सिंहगड रोडला 100 मिमीचा पाऊस पडला आहे. ही एक प्रकारची ढगफुटी आहे. कमी वेळात खूप जास्त पाऊस पडला आहे.
advertisement
दरम्यान, पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी आपत्ती व्यवस्थापनाची तातडीची बैठक बोलावली असून संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पावसाने घेतली पुणे पालिकेची 'परीक्षा', ढगफुटी की आणखी काही? महापौरांनी स्पष्ट सांगितलं!
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement