advertisement

Thane News: 'माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहिलंस?' बॉयफ्रेंड चिडला अन् तरूणाच्या डोक्यात घातली फरशी!

Last Updated:

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एका क्षुल्लक कारणावरून तरूणाने एकाच्या थेट फरशीच डोक्यामध्ये घातली आहे. घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोराविरोधात तक्रार दाखल केलेली आहे.

News18
News18
ठाणे: ठाण्यामध्ये एका क्षुल्लक कारणावरून थेट फरशीच डोक्यामध्ये घातली आहे. हा संपूर्ण प्रकार ठाणे रेल्वे स्थानकावर घडला असून पोलिसांनी हल्लेखोराविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. या घटनेमुळे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये काही काळ भीतीचे वातावरण होतं. "माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहिलंस ?" असं म्हणत त्या प्रियकराने तरूणावर हल्ला केला आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.
ठाणे रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर, एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीकडे पाहिल्याच्या संशयावरून तरूणावर टाईल्सने (फरशी) हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये तो 35 वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला आहे. ठाणे रेल्वे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. शिवाय शिक्षाही सुनावली आहे. 35 वर्षीय तरूण मुंबईतील भांडूप परिसरात आपल्या बहिणीसोबत राहत आहे. तर नोकरीसाठी अंधेरीमध्ये आहे. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ठाण्याला आपल्या मित्रांना भेटण्यासाठी तो ठाण्याला आला होता.
advertisement
ठाण्यामध्ये मित्रांना भेटल्यानंतर तो तरूण मध्यरात्रीच्या वेळी घरी चालला होता. मित्रांना भेटल्यानंतर तो भांडुपला परत जाण्यासाठी स्टेशनचा पादचारी पूल ओलांडत असताना त्याच्या एका तरुणाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 35 वर्षीय तरूण पूर्णच रक्तबंबाळ झाला होता. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी प्रवाशाला तात्काळ ठाणे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्या डोक्याला टाके घालण्यात आले. उपचारानंतर, पीडिताच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Thane News: 'माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहिलंस?' बॉयफ्रेंड चिडला अन् तरूणाच्या डोक्यात घातली फरशी!
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement