advertisement

फ्लॅट दाखवायला घेऊन गेला अन्... ओळखीतल्याच व्यक्तीने केला घात, 'तिच्या'वर सामूहिक अत्याचार

Last Updated:

आरोपींनी तरुणीला ठाकुर्ली येथील एका अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर जोर जबरदस्ती केली. या घटनेनंतर पीडित तरुणीने आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

डोंबिवली
डोंबिवली
अजित मांढरे, प्रतिनिधी, डोंबिवली: डोंबिवलीत एका तरुणीवर झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ओळखीतील व्यक्तीनेच विश्वासघात करीत महिलेवर सामूहिक अत्याचार केले. या प्रकरणात डोंबिवली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची ओळख असलेली एक व्यक्ती ग्राहक असल्याचे सांगत तिच्यासोबत रिक्षामध्ये बसली. संबंधित रिक्षा चालक आणि ती ओळखीची व्यक्ती हे सख्खे भाऊ असल्याचे नंतर उघड झाले. या दोघांनी तरुणीला कल्याण येथे घर पाहण्यासाठी जायचे असल्याचे सांगत तिला सोबत नेले.

आधी तरुणीला बिअर पाजली, नशेत गेल्याचा गैरफायदा घेऊन...

कल्याण परिसरात नेल्यानंतर त्यांनी तरुणीला बिअर पाजली. त्यानंतर ती नशेत गेल्याचा फायदा घेत या दोघांनी आणि त्यांच्या आणखी एका मित्राला घटनास्थळी बोलावून तिच्यावर अत्याचार केले. चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि त्याचा मित्र उमेश वर्मा असे आरोपींची नावे आहेत.
advertisement

अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर जोर जबरदस्ती

आरोपींनी तरुणीला ठाकुर्ली येथील एका अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर जोर जबरदस्ती केली. या घटनेनंतर पीडित तरुणीने आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा यांना अटक केली आहे.

डोंबिवलीच्या घटनेने संतापाचे वातावरण

या प्रकरणाचा पुढील तपास डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी सुरू केला आहे. आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वावी पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला आणि मुलींचा गायब होण्याचा मुद्दा चर्चेत असताना आता डोंबिवलीतील घटनेने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फ्लॅट दाखवायला घेऊन गेला अन्... ओळखीतल्याच व्यक्तीने केला घात, 'तिच्या'वर सामूहिक अत्याचार
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement