APMC Market: शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, केळी अन् कांद्याचे भाव भूईसपाट, लिंबूला काय मिळाला दर?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 928 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 3992 क्विंटल लिंबूस 3500 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
सांगली: आज 2 एप्रिल रोजी राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 36 हजार 801 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये 1771 क्विंटल पांढर्या कांद्याची आवक झाली. त्यास मिळालेला 1375 रुपये आजचा सर्वाधिक कांद्याचा बाजारभाव ठरला. तसेच बाजारातील लाल कांद्याचा सरासरी भाव 600 ते 1413 रुपये दरम्यान राहिला. उन्हाळी कांद्याचा बाजारभाव 866 ते 1000 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे मिळाला.
लिंबूची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 928 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 3992 क्विंटल लिंबूस 3500 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 51 क्विंटल लिंबूस 11625 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
द्राक्ष आवक
राज्याच्या मार्केटमध्ये द्राक्ष आवक वाढली आहे. आज 1294 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 616 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 9500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच अहिल्यानगर बाजारात आवक झालेल्या 5 क्विंटल द्राक्षास 3550 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक
मुंबई मार्केटमध्ये 104 क्विंटल कच्च्या केळीची आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2000 ते 2600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. राज्याच्या मार्केटमध्ये केळीची केवळ 367 क्विंटल एकूण आवक राहिली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 220 क्विंटल केळीची सर्वाधिक आवक झाली. त्यास 1500 रुपये बाजारभाव मिळाला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 9:38 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, केळी अन् कांद्याचे भाव भूईसपाट, लिंबूला काय मिळाला दर?







