The 50 Winner : 'लायन'च्या महालात मराठमोळ्या शिव ठाकरेची डरकाळी, जिंकला The 50 शो? VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
The 50 च्या सेटवरचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात विनर डिक्लर झाल्यानंतर सेटवर फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली.
The 50 हा नवा रिअलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला. 50 स्पर्धकांना लायनच्या महलमध्ये त्यांच्या फॅन्ससाठी खेळवण्यात आलं. लेटेस्ट एपिसोडमध्ये घरातून पाच स्पर्धकांची एक्झिट ऑर्डर काढण्यात आली. तर दुसरीकडे The 50 चा फिनाले पार पडला आहे. 50 स्पर्धकांपैकी एकाने हा शो जिंकला असून त्याच्या एका फॅनला 50 लाख रुपये मिळवून दिले आहेत.
The 50 च्या सेटवरचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात विनर डिक्लर झाल्यानंतर सेटवर फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शो नक्की कोण जिंकलं यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. The 50 कोण जिंकली याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे आणि यात दोन नाव सातत्यानं समोर आली आहेत.
advertisement
1 फेब्रुवारी रोजी The 50 हा शो सुरू झाला होता. 50 स्पर्धकांमधून शिव ठाकरे, फैजू, अमर काका, कृष्णा श्रॉफ हे फिनालेमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मराठमोळा शिव ठाकरे The 50 शोचा पहिला विजेता ठरला आहे. ग्रँड फिनालेमध्ये रजत दलाल पाचव्या नंबरवरून आऊट झाला. त्यानंतर शिव ठाकरे, फैजू, अमर काका, कृष्णा श्रॉफ हे टॉप 4 मध्ये आले.
advertisement
advertisement
पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. The 50 शोचा पहिली विजेता नक्की कोण ठरलं याची घोषणा 22 मार्चला होणाऱ्या फिनाले एपिसोडमध्ये कळणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर The 50 च्या विनर लिस्टमध्ये शिव ठाकरे आणि फैजू यांची नाव घेतली जात आहेत. शिवच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.
शिव ठाकरे याआधी बिग बॉस 16 मध्ये सहभागी झाला होता. पण फिनालेमध्ये जाऊन तो फर्स्ट रनरअप ठरला. त्यानंतर तो खतरो के खिलाडी आणि झलक दिखला जा सारख्या रिअलिटी शोमध्येही दिसला होता. या सगळ्या आधी शिव ठाकरेनं बिग बॉस मराठी 2 ची ट्रॉफी आपल्या नावे केली. शिव ठाकरे The 50 शो जिंकल्याची माहिती समोर येताच त्याच्या चाहत्यांनी आणि संपूर्ण मराठी प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 10:23 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
The 50 Winner : 'लायन'च्या महालात मराठमोळ्या शिव ठाकरेची डरकाळी, जिंकला The 50 शो? VIDEO










