advertisement

Mumbai Local : प्रवाशांनो लक्ष द्या; मुंबई लोकलमध्ये मेट्रो पॅटर्न राबवणार; नेमका रेल्वेचा प्लॅन काय?

Last Updated:

Western Railway : लोकलने प्रवास करत असलेल्या प्रवशांना आता रेल्वेत चढताना आणि उतरताना आता नवा अनुभव मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात नेमका कोणता बदल करण्यात येणार आहे.

Peak hour rush control at Nalasopara station
Peak hour rush control at Nalasopara station
ठाणे : मुंबई लोकल म्हटली की डोळ्यासमोर उभी राहते ती प्रचंड गर्दी आणि धावपळ. विशेषतहा गाडीत चढताना आणि उतरताना प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा या गोंधळात अपघातही घडतात. मात्र आता या समस्यांवर तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
रेल्वेचा नवा 'क्राउड मॅनेजमेंट' फंडा
पश्चिम रेल्वेने उपनगरी लोकलमध्ये चढ-उतारावेळी होणारी गर्दी आणि गोंधळ कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने नालासोपारा स्थानकावर नवीन उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक डब्याच्या दारासमोर फलाटावर रंगीत पट्टे आणि पायचिन्हे काढण्यात आली आहेत. प्रवाशांनी त्या चिन्हांवर रांगेत उभे राहून आधी उतरणाऱ्या प्रवाशांना मार्ग द्यावा आणि त्यानंतरच गाडीत चढावे असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
नालासोपाऱ्यात रेल्वेने असा राबवला मेट्रो पॅटर्न
सकाळच्या गर्दीच्या वेळेत खास करुन (सकाळी 6 ते 11) नालासोपारा स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विशेष क्राउड मॅनेजमेंट मोहीम राबवली. या मोहिमेत आरपीएफ आणि एमएसएफचे एकूण 22 कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामध्ये 12 आरपीएफ आणि 10 एमएसएफ जवानांचा समावेश होता.
कर्मचाऱ्यांनी प्लॅटफॉर्मवर उभे राहून प्रवाशांना दोन रांगांमध्ये उभे राहण्यास सांगितले. गाडी थांबल्यानंतर आधी उतरणाऱ्यांना जागा देण्याचा सरावही करून घेतला. या उपक्रमामुळे चढ-उतार अधिक शिस्तीत होण्यास मदत होत आहे.
advertisement
स्थानकांवरही ही पद्धत लवकर लागू
ही योजना पुढील दोन महिने चाचणी म्हणून सुरू ठेवली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर गर्दीच्या स्थानकांवरही अशीच रंगीत मार्किंग आणि रांग पद्धती लागू केली जाईल अशी माहिती मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक पंकज सिंग यांनी दिली.
लोकल प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रवाशांकडूनही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : प्रवाशांनो लक्ष द्या; मुंबई लोकलमध्ये मेट्रो पॅटर्न राबवणार; नेमका रेल्वेचा प्लॅन काय?
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement