advertisement

Ramzan 2026: 18 कि 19 फेब्रुवारी? कधीपासून सुरू होतोय माह-ए-रमजान, सेहरी आणि इफ्तारच्या वेळा पाहा

Last Updated:

Roza Sehr and Iftaar Time Table: या वर्षी 18 किंवा 19 फेब्रुवारी 2026 पासून रमजानची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात, रमजानची नेमकी तारीख ही चंद्राच्या दर्शनावर (चाँद का दीदार) अवलंबून असते..

News18
News18
नवी दिल्ली : मुस्लिम धर्मात सर्वात पवित्र मानला जाणारा रमजानचा महिना आता लवकरच सुरू होणार आहे. या वर्षी 18 किंवा 19 फेब्रुवारी 2026 पासून रमजानची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात, रमजानची नेमकी तारीख ही चंद्राच्या दर्शनावर (चाँद का दीदार) अवलंबून असते, त्यामुळे चंद्र दिसल्यानंतरच यावर शिक्कामोर्तब होईल.
रमजान हा इस्लामिक कॅलेंडरमधील 9 वा महिना असतो. या पूर्ण महिन्यात सलग 30 दिवस उपवास म्हणजेच 'रोजा' ठेवला जातो. रोजाची सुरुवात पहाटे 'सहरी'ने (सूर्योदयापूर्वीचे अन्न) होते आणि संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर 'इफ्तार'ने रोजा सोडला जातो. या काळात दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे आणि रात्री विशेष 'तरावीह' नमाज अदा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या पवित्र महिन्यात केवळ उपवासच नाही, तर अल्लाची इबादत, दुआ आणि गरीब-गरजू लोकांना मदत (झकात आणि फितरा) करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. या महिन्यात केलेल्या चांगल्या कर्मांचे पुण्य 70 पटीने वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
नवी दिल्लीनुसार रोजा सेहरी आणि इफ्तार वेळापत्रक -
रोजा तारीखसेहरीइफ्तार
0119 February 202605:37 AM06:14 PM
0220 February 202605:36 AM06:15 PM
0321 February 202605:35 AM06:15 PM
0422 February 202605:35 AM06:16 PM
0523 February 202605:34 AM06:17 PM
0624 February 202605:33 AM06:17 PM
0725 February 202605:32 AM06:18 PM
0826 February 202605:31 AM06:19 PM
0927 February 202605:30 AM06:19 PM
1028 February 202605:29 AM06:20 PM
1101 March 202605:28 AM06:21 PM
1202 March 202605:27 AM06:21 PM
1303 March 202605:26 AM06:22 PM
1404 March 202605:25 AM06:23 PM
1505 March 202605:24 AM06:23 PM
1606 March 202605:23 AM06:24 PM
1707 March 202605:22 AM06:24 PM
1808 March 202605:21 AM06:25 PM
1909 March 202605:20 AM06:26 PM
2010 March 202605:19 AM06:26 PM
2111 March 202605:17 AM06:27 PM
2212 March 202605:16 AM06:27 PM
2313 March 202605:15 AM06:28 PM
2414 March 202605:14 AM06:29 PM
2515 March 202605:13 AM06:29 PM
2616 March 202605:12 AM06:30 PM
2717 March 202605:10 AM06:30 PM
2818 March 202605:09 AM06:31 PM
2919 March 202605:08 AM06:32 PM
advertisement
रोजाचे महत्त्व आणि इतिहास -
इस्लामिक मान्यतेनुसार, पवित्र ग्रंथ 'कुराण'चे पहिले अवतरण (वही) रमजानच्या याच महिन्यात झाले होते. सौदी अरेबियातील मक्का शहराच्या जवळ असलेल्या 'गार-ए-हिरा' (हिरा गुहा) येथे हा ईश्वरीय संदेश प्राप्त झाला होता. याच कारणामुळे रमजानला 'शहर-ए-कुराण' (कुराणचा महिना) असेही म्हटले जाते.
advertisement
इस्लाममध्ये रोजा ठेवणे हे हिजरतच्या दुसऱ्या वर्षी (साधारण इसवी सन 624) अनिवार्य (फर्ज) करण्यात आले. हा आदेश मदिनामध्ये देण्यात आला होता. इस्लामच्या पाच प्रमुख स्तंभांपैकी (कलमा, नमाज, रोजा, झकात आणि हज) रोजा हा एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ मानला जातो.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Ramzan 2026: 18 कि 19 फेब्रुवारी? कधीपासून सुरू होतोय माह-ए-रमजान, सेहरी आणि इफ्तारच्या वेळा पाहा
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement