advertisement

Surya Grahan 2026: साडेसातीतून सुटका! शनिच्या राशीत सूर्याला ग्रहण लागल्याचा 3 राशींना लाभ, मरगळ दूर

Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिष शास्त्रानुसार आजचं सूर्यग्रहण खूपच वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातंय, कारण ग्रहांची एक दुर्मिळ स्थिती आज पाहायला मिळतेय. सूर्य 13 फेब्रुवारीलाच कुंभ राशीत दाखल झाला असून, आज 17 फेब्रुवारी 2026 रोजी याच राशीत वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण होत आहे. खास म्हणजे आज कुंभ राशीत केवळ सूर्यच नाही, तर मंगळ, बुध, शुक्र आणि चंद्र हे चार महत्त्वाचे ग्रह सुद्धा एकत्र आले आहेत.
1/6
शनिदेवाच्या मालकीच्या कुंभ राशीत एकाच वेळी हे पाच ग्रह एकत्र आल्याने एक शक्तिशाली 'पंचग्रही योग' तयार झाला आहे. ग्रहणाचं सावट असलं तरी, हा योग काही राशींच्या आयुष्यात आनंदाची पहाट घेऊन येणारा ठरू शकतो.

2/6
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ संधींचं सोनं करण्याचा आहे. जर तुम्ही नोकरीमध्ये बदल करू इच्छित असाल किंवा पदोन्नतीची वाट पाहत असाल, तर आजचे ग्रहमान तुम्हाला अनुकूल आहेत. तुम्हाला कामाच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, ज्यामुळे तुमचं वर्चस्व वाढेल.

3/6
मिथुन राशीच्या व्यापाऱ्यांना परदेशातून किंवा नवीन क्लाइंट्सकडून मोठे प्रोजेक्ट्स मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक बाजू भक्कम होण्यासोबतच, तुमची सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा उंचावेल. विशेषतः जे तरुण मीडिया, जनसंपर्क किंवा लेखन क्षेत्रात आहेत, त्यांच्या कल्पकतेला योग्य वाव मिळेल आणि त्यांचं कौतुक होईल. आरोग्याबाबत असलेल्या जुन्या तक्रारी आता हळूहळू दूर होतील.

4/6
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक सुबत्ता घेऊन येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जी आर्थिक ओढाताण तुम्ही अनुभवत होतात, ती आता संपण्याची चिन्हे आहेत. तुमचे अडकलेले पैसे, मग ते व्यवसायातील असोत किंवा कुणाला उसने दिलेले, ते परत मिळण्याचे योग आहेत. शेअर बाजार किंवा इतर जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो.

5/6
तूळ - तुम्ही एखादा नवीन उद्योग सुरू करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर त्यासाठी आजपासून तयारी करायला हरकत नाही. एखादा मोठा व्यावसायिक करार तुमच्या हाती लागू शकतो, ज्यामुळे भविष्यातील पैशांची चिंता मिटेल. महत्त्वाचं म्हणजे, कर्जाचा डोंगर कमी झाल्यामुळे तुम्हाला जो मानसिक दिलासा मिळेल, तो शब्दांत सांगण्यापलीकडे असेल.

6/6
धनू राशीच्या व्यक्तींसाठी नशीब आता जोरात साथ देणार आहे. या पाच ग्रहांच्या युतीमुळे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. एखादं काम जमत नाहीये म्हणून तुम्ही सोडून दिलं असेल, तर ते पुन्हा हाती घ्या, यश तुमचंच आहे. स्वतःच्या हक्काचं घर घेण्याचं किंवा नवीन गाडी खरेदी करण्याचं स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतं. कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंदाचं वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, पण मोठी चिंता करण्यासारखं काहीच नाही. बऱ्याच काळापासून रखडलेली कामं मार्गी लागल्याने तुमचं मन उत्साही राहील.

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement