Bigg Boss Marathi 6 : सगळे शांत शांत म्हणत होते! पहिल्यांदाच दिसला सचिन कुमावतचा असा चेहरा; थेट राखीला...
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी सहाव्या सीझनमधील सदस्यांमध्ये सचिन कुमावत सगळ्यात शांत सदस्य. पण पहिल्यांदाच त्याचं असं रूप दिसलं जे आजवर कुणीच पाहिलं नव्हतं.
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये सगळ्यात शांत सदस्य कोणता असेल तर तो म्हणजे सचिन कुमावत. भांडण, वाद याच्याविरोधातच तो नेहमी राहिला आहे. नेहमी मवाळ भूमिका घेतली, त्याने आपली बाजूही अगदी शांतपणे मांडली आहे. पण आता पहिल्यांदाच सचिन कुमावतचा असा चेहरा दिसला जो याआधी कुणीच पाहिला नाही.
बिग बॉस मराठी 6 च्या घरात सचिन कुमावत पहिल्यांदाच भडकलेला दिसला आहे. याचं कारण म्हणजे राखी सावंत. राखीचे नखरे पाहून सचिनच्या रागाचा पारा चढला आहे. सचिन कुमावतने तसा आजवर घरातील कोणत्या सदस्याशी म्हणावा तसा पंगा घेतलेला नाही. पण तो राखीशी मात्र थेट भिडला आहे.
advertisement
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात सचिन राखीवर भडकलेला दिसतो आहे. याचं कारण म्हणजे राखीने प्राजक्ता शुक्रेच्या अंगावर पीठ फेकलं. प्रोमोत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला राखी प्राजक्ताला सांगते चला झाडू मारा आता नाटका नकोत मला. त्यावर प्राजक्ता मी एकटी नाही करणार असं म्हणताना दिसते. त्यानंतर राखी आता माझं डोकं फिरलंय असं म्हणत किचनमधील पीठ घेते आणि ते प्राजक्ताच्या तोंडावर फेकते.
advertisement
यानंतर मात्र घरातील सगळे सदस्य पेटून उठतात. कुणीतरी तिला बिनडोक म्हणतं, त्यानंतर सचिन कुमावत पहिलं हे साफ कर असं सांगतो. यावर राखी त्याला निघा असं म्हणते. तर सागर पीठबिट टाकायचं तर घरी टाकायचं इथं कुणावर टाकायचं नाही असं सांगतो, राखी त्याला शटअप म्हणते, सागर तिला यूशटणप म्हणतो. राखी काही ऐकत नाही. मग विशाल, सचिनही राखीवर पीठ टाकतात.
advertisement
राखी नंतर पाय जमिनीवर रगडून तुम्ही माझ्या पायाखाली असं म्हणते. तितक्यात सचिन तिथं येतो आणि तो तिच्या तोंडावर पाणी फेकतो आणि बंद कर असं ओरडतो. सचिनने तोंडावर पाणी फेकताच राखी पेटून उठते. ती खुर्ची फेकते आणि पाणी टाकलं मला, माफी मांग असं सांगते. पण सचिन आतमध्ये निघून जातो.
advertisement
सचिन कुमावतचं हे रूप पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले आहेत. सचिन दादा काही आता ऐकत नसतो, सचिन शेठ आपला, सचिन भाऊ कडक अशा प्रतिक्रिया यावर उमटत आहेत. तर काहींनी राखीमुळे आता लोक दिसू लागलेत असं म्हटलं आहे.
advertisement
या प्रोमोमध्ये आजवर एकमेकांच्या विरोधात असलेल्या टोळी आणि टीममध्ये पहिल्यांदाच एकी दिसली आहे. राखीविरोधात घरातील सगळे सदस्य एकवटलेले पाहायला मिळालेत. त्यामुळे आता नवा कोणता ड्रामा पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 9:58 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : सगळे शांत शांत म्हणत होते! पहिल्यांदाच दिसला सचिन कुमावतचा असा चेहरा; थेट राखीला...










