advertisement

Surya Grahan 2026: कंकणाकृती सूर्यग्रहण आज कधीपासून कधीपर्यंत? अचूक वेळ, काय टाळावं, कुठं दिसेल?

Last Updated:

Surya Grahan 2026 : आजच्या सूर्यग्रहणाची वेळ काय आहे, ते कुठे दिसेल आणि ज्योतिषांनुसार याचा नेमका काय परिणाम होईल, हे सोप्या भाषेत समजून घेऊया.

News18
News18
मुंबई : आज 17 फेब्रुवारी 2026 चा हा दिवस खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्ही दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातोय. वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आज लागत असून याला कंकणाकृती सूर्यग्रहण (रिंग ऑफ फायर) असं म्हटलं जातंय. पण हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये. तरीही ग्रहणाचं नाव काढलं की लोकांच्या मनात उत्सुकता आणि थोडी भीती दोन्ही दाटून येते. घरातील वडीलधारी मंडळी सुतकाच्या गोष्टी करतात, तर तरुण पिढी गुगलवर याचं लाईव्ह स्ट्रीमिंग शोधतेय. आजच्या सूर्यग्रहणाची वेळ काय आहे, ते कुठे दिसेल आणि ज्योतिषांनुसार याचा नेमका काय परिणाम होईल, हे सोप्या भाषेत समजून घेऊया.
सगळ्यात महत्त्वाचा आणि घराघरात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सुतक लागेल का? ज्योतिषशास्त्राच्या परंपरेनुसार, ज्या ठिकाणी ग्रहण दिसत नाही, तिथे सुतकाचे नियम लागू होत नाहीत. 17 फेब्रुवारी 2026 चं हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे मंदिरांचे दरवाजे बंद होणार नाहीत आणि रोजची पूजा-अर्चा नेहमीप्रमाणे सुरू राहील. ज्योतिषांच्या मते, सुतकाचे नियम फक्त ग्रहण दिसणाऱ्या भागातच पाळले जातात. त्यामुळे भारतात सगळी कामं नेहमीसारखीच चालतील.
advertisement
ग्रहणाची वेळ: नेमकी कधी ते कधी?
भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी संपेल. ग्रहणाचा एकूण काळ साधारण 4 तास 32 मिनिटांचा असेल. ग्रहणाची सर्वात महत्त्वाची स्थिती संध्याकाळी 5 वाजून 42 मिनिटांनी असेल. याच काळात कंकणाकृती म्हणजे रिंग ऑफ फायरचं दृश्य पाहायला मिळेल, जेव्हा चंद्र सूर्याच्या मधोमध येतो पण त्याला पूर्णपणे झाकू शकत नाही आणि बाजूने आगीच्या कड्यासारखी एक चमकदार रिंग दिसते. हेच दृश्य खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
advertisement
कुठे दिसणार रिंग ऑफ फायर?
हे ग्रहण भारतात दिसणार नसलं तरी जगातील काही भागात याचं विलोभनीय दृश्य पाहायला मिळेल. कंकणाकृती सूर्यग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिकाचा मोठा भाग आणि दक्षिण महासागराच्या आसपास दिसेल. त्याशिवाय दक्षिण आफ्रिका, टांझानिया, झांबिया आणि झिम्बाब्वे यांसारख्या देशांमध्येही हे ग्रहण पाहता येईल. तिथले शास्त्रज्ञ आणि खगोलप्रेमी विशेष उपकरणांसह याची तयारी करत आहेत.
advertisement
काय करावे?
1. नेहमीची कामं सुरू ठेवा: ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे ऑफिस, व्यापार, घरातील कामं किंवा पूजा-पाठ नेहमीप्रमाणेच करा.
2. मंत्र जप आणि ध्यान: अनेकांना ग्रहणाच्या काळात ध्यान किंवा नामस्मरण करायला आवडतं. मानसिक शांततेसाठी ही चांगली संधी असू शकते.
advertisement
3. लाईव्ह स्ट्रीमिंग: जर तुम्हाला रिंग ऑफ फायर पहायचं असेल, तर विश्वसनीय वैज्ञानिक चॅनेल किंवा वेधशाळांच्या लाईव्ह स्ट्रीमवर ते पाहू शकता.
4. गर्भवती महिलांनी ताण घेऊ नये: भारतात ग्रहण दिसत नसल्यामुळे कोणत्याही विशेष निर्बंधांची गरज नाही. फक्त आरोग्याची सामान्य काळजी घ्या.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Surya Grahan 2026: कंकणाकृती सूर्यग्रहण आज कधीपासून कधीपर्यंत? अचूक वेळ, काय टाळावं, कुठं दिसेल?
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement