advertisement

Shani Gochar: झाली बाबा, जाणार एकदाची पिडा! 30 वर्षांनी शनिचा मेष राशीत प्रवेश, या राशींची साडेसातीतून सुटका

Last Updated:
Shani Gochar: ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला न्यायदेवता आणि कर्माचं फळ देणारे मानले जातात. येणाऱ्या 2027 सालामध्ये शनीचे महत्त्वाचे राशीपरिवर्तन होणार आहे, त्यानं राशीचक्राची सगळी गणितं बदलून जातील. शनीचा हा फेरबदल तब्बल 30 वर्षांनंतर पाहायला मिळणार आहे. शनिदेव आपल्या नीच राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहेत.
1/6
शनिमुळे होत असलेल्या या मोठ्या बदलाचा थेट परिणाम आपल्या नोकरी-धंद्यावर आणि खिशावर होणार आहे. हा काळ काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरेल, तर काहींसाठी नवीन आव्हाने उभी करेल.

2/6
शनीचा मेष राशीतला प्रवेश इतका महत्त्वाचा का?शनी हा ग्रह खूप हळू चालतो. तो एका राशीत साधारण अडीच वर्षं मुक्काम करतो. मेष ही शनीची नीच रास असल्यामुळे, इथे त्यांचं वागणं खूप प्रभावी आणि महत्त्वाचं असतं. या काळात अनेकांच्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळू शकते. जे लोक खूप दिवसांपासून मेहनत करतायत पण त्यांना यश मिळत नव्हतं, त्यांच्या मार्गातले अडचणी आता दूर होतील. रखडलेली पदोन्नती आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील.

3/6
शनीच्या जाचातून कोणाची सुटका होणार?कुंभ: कुंभ राशीच्या लोकांवर गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली शनीची साडेसाती अखेर संपणार आहे. मानसिक ताण, नाहक खर्च आणि कामात होणारा उशीर यातून आता तुमची सुटका होईल. नोकरीत नवीन संधी आणि मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे चालून येतील.

4/6
सिंह आणि धनू: या दोन्ही राशींवरची शनीची अडीचकी आता संपणार आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात सुरू असलेल्या कटकटी किंवा कामातले अडथळे आता कायमचे दूर होतील. रखडलेल्या कामांना आता चांगला वेग येईल.

5/6
या राशींच्या अडचणी वाढू शकतात -वृषभ रास: यांच्यावर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे.
कन्या आणि मकर रास: या राशींवर शनीच्या अडीचकीचा प्रभाव सुरू होईल. या लोकांनी पैशांच्या बाबतीत जपून पावलं उचलावीत. कोणताही मोठा व्यवहार किंवा निर्णय घाईघाईत करू नका.
या राशींच्या अडचणी वाढू शकतात -वृषभ रास: यांच्यावर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे.कन्या आणि मकर रास: या राशींवर शनीच्या अडीचकीचा प्रभाव सुरू होईल. या लोकांनी पैशांच्या बाबतीत जपून पावलं उचलावीत. कोणताही मोठा व्यवहार किंवा निर्णय घाईघाईत करू नका.
advertisement
6/6
पैशांचे योग - कुंभ, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी 2027 हे वर्ष पैशांच्या बाबतीत खूप भरभराटीचं असेल. व्यापाऱ्यांना नवीन गिऱ्हाईकं आणि मोठे सौदे मिळतील. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढीची एखादी गोड बातमी मिळू शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement