सोन्या'सारखा विश्वास धुळीला; पुण्यात सराफा व्यावसायिकासोबत कामगारानेच केलं धक्कादायक कांड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
फिर्यादी देवेश वर्मा यांनी संशयित आरोपी श्रीमंता समांता याच्याकडे दागिने बनवण्याचे काम विश्वासाने सोपवले होते. दरम्यान, २४५ ग्रॅम सोने वितळविण्यासाठी आरोपीकडे दिले असता, त्याने त्या सोन्याचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला.
पिंपरी: सोन्याच्या दागिन्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे, चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. अशात अगदी कोणावरही विश्वास ठेवणं, किती महागात पडू शकतं, याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. मालकाने विश्वासाने दिलेले २२ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोने वितळविण्याच्या बहाण्याने हडप करणाऱ्या एका कामगाराला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. ही धक्कादायक घटना चिंचवडगाव येथील गांधी पेठेतील 'प्रियांका ज्वेलर्स' येथे घडली.
याप्रकरणी देवेश कैलाश वर्मा (वय २७, रा. वाकड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी श्रीमंता संतोष समांता (वय ४३, मूळ रा. पश्चिम बंगाल) याला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या काळात फिर्यादी देवेश वर्मा यांनी संशयित आरोपी श्रीमंता समांता याच्याकडे दागिने बनवण्याचे काम विश्वासाने सोपवले होते. दरम्यान, २४५ ग्रॅम सोने वितळविण्यासाठी आरोपीकडे दिले असता, त्याने त्या सोन्याचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला. २२ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वर्मा यांनी पोलिसांत धाव घेतली.
advertisement
चिंचवड पोलिसांनी तत्परतेने तपास चक्रे फिरवून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे स्थानिक सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, कामगारांची नेमणूक करताना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 9:59 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सोन्या'सारखा विश्वास धुळीला; पुण्यात सराफा व्यावसायिकासोबत कामगारानेच केलं धक्कादायक कांड










