Weather Alert: महाराष्ट्रात 24 तासांत वारं फिरलं, पावसाचं संकट टळलं, पण IMD चा वेगळाच अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert in Marathi: फेब्रुवारीच्या मध्यावर महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मंगळवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोकण ते विदर्भ सर्वच भागांत प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण हवामान असल्याचे चित्र आहे. 17 फेब्रुवारी रोजी देखील हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून तापमानात मात्र पुन्हा वाढ होण्याचा अंदाज आहे. मंगळवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात उष्ण व दमट वातावरण राहील. मुंबई परिसरात कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर किमान तापमान 23 ते 24 अंशांच्या आसपास नोंदवले जाईल. आर्द्रता जास्त असल्याने दुपारच्या वेळी उकाडा अधिक जाणवेल. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्णतेची स्थिती कायम राहील.
advertisement
advertisement
मराठवाडा आणि विदर्भात कोरडे व उष्ण हवामान कायम राहील. मराठवाड्यात कमाल तापमान 37 ते 38 अंशांपर्यंत पोहोचेल आणि किमान तापमान 17 ते 19अंशांदरम्यान राहील. विदर्भात उष्णतेची तीव्रता अधिक राहील; काही भागांत कमाल तापमान 38 ते 39 अंशांपर्यंत नोंदवले जाईल, तर किमान तापमान 19 ते 21 अंशांच्या आसपास राहील. दुपारच्या वेळी कडक ऊन राहील.
advertisement
एकंदरीत राज्यभर आज 17 फेब्रुवारी रोजी राज्यातील हवामानात कालच्या तुलनेत किंचित बदल दिसून येईल. बहुतांश भागांत कमाल तापमानात सुमारे 1 अंशांची वाढ नोंदवली जाईल, तर किमान तापमानात विशेष बदल जाणवणार नाही. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता कालपेक्षा थोडी अधिक असेल. आकाश मुख्यतः स्वच्छ राहील आणि पावसाची कोणतीही शक्यता हवामान विभागा कडून स्पष्ट करण्या येईल.









