advertisement

T20 World Cup : निसंकाच्या वादळाने लंका सुपर-8 मध्ये, ऑस्ट्रेलियाचं रिटर्न तिकीट कन्फर्म, मॅचचे 5 टर्निंग पॉईंट

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पहिलं शतक झालं आहे. श्रीलंकेच्या पथुम निसांकाच्या वादळी शतकाचा ऑस्ट्रेलियाला तडाखा बसला आहे.
1/8
पथुम निसांका श्रीलंकेच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 182 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. कुसल परेरा फक्त 1 रन करून आऊट झाला, यानंतर निसांका आणि मेंडिस यांनी ऑस्ट्रेलियन बॉलिंगवर आक्रमण केलं.

2/8
पथुम निसांकाने 52 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 10 फोरच्या मदतीने नाबाद 100 रनची मॅच विनिंग खेळी केली. तर कुसल मेंडिसने 38 बॉलमध्ये 51 रनची खेळी केली, ज्यात 6 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता.

3/8
या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे ओपनर मिचेल मार्श आणि ट्रॅविस हेड यांनी 8.3 ओव्हरमध्येच 104 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. हेडने 29 बॉलमध्ये 56 आणि मिचेल मार्शने 27 बॉलमध्ये 54 रन केले.

4/8
मार्श आणि हेडची विकेट गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाची बॅटिंग गडगडली आणि 181 रनवर त्यांचा ऑलआऊट झाला. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमला 100 रनची ओपनिंग पार्टनरशीप मिळूनही ऑलआऊट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

5/8
श्रीलंकेकडून दुषन हेमंताला सर्वाधिक 3 विकेट आणि दुष्मंता चमिराला 2 विकेट मिळाल्या. याशिवाय तीक्षणा, वेलालेगे आणि कामिंदू मेंडिसला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

6/8
श्रीलंकेविरुद्धच्या या पराभवासोबतच ऑस्ट्रेलियाच्या सुपर-8 स्टेजला क्वालिफाय व्हायच्या स्वप्नांना जबर धक्का बसला आहे. आधीच झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवणं गरजेचं होतं.

7/8
3 सामन्यांमध्ये 1 विजय आणि 2 पराभवांसह ऑस्ट्रेलिया ग्रुप बी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता ऑस्ट्रेलियाला सुपर-8 ला क्वालिफाय होण्यासाठी इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. दुसरीकडे श्रीलंकेची सुपर-8 मध्ये दिमाखात एन्ट्री झाली आहे. श्रीलंकेने 3 सामन्यांमध्ये 3 विजय मिळवत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे.

8/8
पथुम निसांका, कुसल मेंडिसची बॅटिंग दुशान हेमंता, दुष्मंता चमिराची बॉलिंग आणि पथुम निसांकाने घेतलेला धोकादायक ग्लेन मॅक्सवेलचा अफलातून कॅच हे या सामन्याचे टर्निंग पॉईंट ठरले.

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement