advertisement

'इतक्या घाणेरड्या जागी मला प्रपोज केलं...', वांद्रेतल्या 'या' ठिकाणी पूजा बिरारीने सोहम बांदेकरला घातलेली अंगठी, सांगितला अतरंगी किस्सा!

Last Updated:
सोहम आणि पूजा यांच्या साखरपुड्याची गोष्ट खूपच फिल्मी आणि मजेशीर आहे. नुकत्याच एका मुलाखतीत पूजाने त्यांच्या एंगेजमेंट रिंगचा किस्सा सांगितला, जो ऐकून चाहत्यांना धक्काच बसला आहे.
1/11
महाराष्ट्राचे लाडके 'भावोजी' म्हणजेच आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांची लव्हस्टोरी मराठी चाहत्यांसाठी काही नवी नाही. गेल्या वर्षी त्यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचं थाटामाटात लग्न झालं.

2/11
२ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्यात शाही थाटात विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि रिसेप्शनचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजले.
२ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्यात शाही थाटात विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि रिसेप्शनचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजले.
advertisement
3/11
मात्र, या दोघांच्या साखरपुड्याची गोष्ट खूपच फिल्मी आणि मजेशीर आहे. नुकत्याच एका मुलाखतीत पूजाने त्यांच्या एंगेजमेंट रिंगचा किस्सा सांगितला, जो ऐकून चाहत्यांना धक्काच बसला आहे.
मात्र, या दोघांच्या साखरपुड्याची गोष्ट खूपच फिल्मी आणि मजेशीर आहे. नुकत्याच एका मुलाखतीत पूजाने त्यांच्या एंगेजमेंट रिंगचा किस्सा सांगितला, जो ऐकून चाहत्यांना धक्काच बसला आहे.
advertisement
4/11
सोहम आणि पूजाने लग्नाच्या खूप आधीच एकमेकांसाठी अंगठ्या खरेदी केल्या होत्या. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी कोणताही गाजावाजा केला नाही.
सोहम आणि पूजाने लग्नाच्या खूप आधीच एकमेकांसाठी अंगठ्या खरेदी केल्या होत्या. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी कोणताही गाजावाजा केला नाही.
advertisement
5/11
अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून दोघंही कोणालाही न सांगता दुकानात गेले आणि एकमेकांसाठी अंगठ्या घेतल्या. पण गंमत म्हणजे, अंगठ्या घेऊन आल्यावर दोघंही त्याबद्दल पूर्णपणे विसरून गेले.
अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून दोघंही कोणालाही न सांगता दुकानात गेले आणि एकमेकांसाठी अंगठ्या घेतल्या. पण गंमत म्हणजे, अंगठ्या घेऊन आल्यावर दोघंही त्याबद्दल पूर्णपणे विसरून गेले.
advertisement
6/11
लग्नाला अवघे तीन दिवस उरले असताना सोहम जेव्हा आपलं कपाट आवरत होता, तेव्हा त्याला अचानक ती अंगठी सापडली. सोहम म्हणाला,
लग्नाला अवघे तीन दिवस उरले असताना सोहम जेव्हा आपलं कपाट आवरत होता, तेव्हा त्याला अचानक ती अंगठी सापडली. सोहम म्हणाला, "मी आयुष्यात कधी दागिने घालत नाही, फक्त घड्याळ घालतो. त्यामुळे अंगठी घालणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. ती सापडल्यावर मग मी कोरिओग्राफरच्या मदतीने लग्नात अंगठी घालण्याचा प्लॅन केला."
advertisement
7/11
पूजा बिरारीने या सोहळ्यातील सर्वात विचित्र आणि विनोदी क्षण शेअर केला. ती म्हणाली,
पूजा बिरारीने या सोहळ्यातील सर्वात विचित्र आणि विनोदी क्षण शेअर केला. ती म्हणाली, "आम्ही जेव्हा अंगठ्या घेऊन दुकानातून निघालो, तेव्हाच मी सोहमला म्हटलं होतं की, मला काही खूप मोठं प्रपोजल नकोय. प्रपोज करण्यासाठी हॉटेलमध्ये जाणं वगैरे मला खूप क्रींज वाटतं."
advertisement
8/11
ती पुढे म्हणाली, मी सोहमला म्हटलं की तू मला भविष्यात प्रपोज करशीलही. पण, मुली मुलाला प्रपोज का करत नाहीत? मी तिथेच त्याला म्हटलं की चल ही अंगठी घालून बघ.
ती पुढे म्हणाली, मी सोहमला म्हटलं की तू मला भविष्यात प्रपोज करशीलही. पण, मुली मुलाला प्रपोज का करत नाहीत? मी तिथेच त्याला म्हटलं की चल ही अंगठी घालून बघ."
advertisement
9/11
पूजाने सांगितलं,
पूजाने सांगितलं, "सोहम 'बघू बघू' म्हणत असतानाच मी ती अंगठी त्याच्या बोटात चढवली. त्यावर सोहमची प्रतिक्रिया होती, 'काय ग, वांद्र्याच्या एवढ्या घाण पेट्रोल पंपवर तू मला प्रपोज केलंस?'"
advertisement
10/11
नंतर पूजाच त्याला म्हणाली की आता नको, त्यातली गंमत जाईल. त्यानंतर त्यांनी त्या अंगठ्या तशाच ठेवून दिल्या आणि ते त्या विसरूनच गेले. 
नंतर पूजाच त्याला म्हणाली की आता नको, त्यातली गंमत जाईल. त्यानंतर त्यांनी त्या अंगठ्या तशाच ठेवून दिल्या आणि ते त्या विसरूनच गेले.
advertisement
11/11
अखेर लग्नाच्या दोन दिवस आधी त्या अंगठ्या पुन्हा बाहेर आल्या. सोहमने कोरिओग्राफरशी हातमिळवणी करून एक रोमँटिक सेटअप तयार केला आणि सर्वांसमोर पूजाला अधिकृतपणे अंगठी घातली.
अखेर लग्नाच्या दोन दिवस आधी त्या अंगठ्या पुन्हा बाहेर आल्या. सोहमने कोरिओग्राफरशी हातमिळवणी करून एक रोमँटिक सेटअप तयार केला आणि सर्वांसमोर पूजाला अधिकृतपणे अंगठी घातली.
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement