advertisement

जालन्याच्या शेतकऱ्यानं घेतलं पैशाचं पीक! एका एकरात 10 लाखांची कमाई, काय केलं? Video

Last Updated:

Agriculture Success: शेतकरी बांधवांनी शेतीस जोडधंदा करू नये, तर शेतीच जोडधंदा म्हणून करावी, असा सल्ला शेतकरी संदीप उबाळे देतात.

+
जालन्याच्या

जालन्याच्या शेतकऱ्यानं घेतलं पैशाचं पीक! एकरात 10 लाखांची कमाई, काय केलं? Video

जालना: सध्याच्या काळात मराठवाड्यातील शेतकरी देखील फळबागांच्या शेतीतून बक्कळ कमाई करत आहेत. द्राक्ष हे निसर्गाला अतिशय संवेदनशील असं पीक आहे. अधिक खर्चिक असल्याने शक्यतो सधन शेतकरीच द्राक्ष शेतीकडे वळतात. मात्र जालना जिल्ह्यातील नंदापूर आणि कडवंची परिसर याला अपवाद ठरला आहे. नंदापूरचे शेतकरी संदीप उबाळे हे याच द्राक्ष शेतातून बक्कळ कमाई करत आहेत. लोकल18 च्या माध्यमातून त्यांनी यशाचं रहस्य सांगितलंय.
नंदापूर आणि कडवंची परिसरातील जवळपास सर्वच शेतकरी द्राक्ष शेती करतात. परंतु, कोविड काळात द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांवर नांगर फिरवला. नंदापूरचे संदीप उबाळे हे 2017 पासून द्राक्ष शेतीत आहेत. त्यामुळे कोविडनंतर लागलेल्या लॉकडाऊन आणि द्राक्ष बागायतदारांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ त्यांनी अनुभवले आहे. याच काळात त्यांनी एक प्लॉट काढून देखील टाकला. परंतु, दिवस टिकून राहत नाहीत. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा उभारू देणारे दर मिळत असल्याने संदीप उबाळे यांना एकरी तब्बल 10 लाख रुपयांचा नफा होत आहे.
advertisement
उबाळे यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तीन ते चार वाणांची द्राक्षे आहेत. त्यांचा सव्वा एकरचा एक प्लॉट 90 रुपये किलो दराने विक्री झाला असून त्यात त्यांना 150 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. तर दुसरा 30 गुंठे क्षेत्रातील द्राक्षांची 70 रुपये किलो दराने विक्री झाली असून यातून 90 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. तर आणखी 3 एकराचा प्लॉट असून त्यात त्यांना 300 क्विंटल उत्पादन होणार आहे. अशा प्रकारे 5 ते 6 एकर द्राक्ष शेतीतून खर्च वजा जाता त्यांना 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.
advertisement
शेतकऱ्यांना सल्ला
शेतकरी बांधवांनी शेतीस जोडधंदा करू नये, तर शेतीच जोडधंदा म्हणून करावी. म्हणजे मुख्य उत्पन्नाचा स्रोत दुसरा असावा. शेती 99 टक्के निसर्गाच्या भरवशावर आहे. केवळ 1 टक्का आपल्या हातात आहे. त्यामुळे शेती करताना हवामान आणि पिकांचे योग्य नियोजन करावे, असा मोलाचा संदेश त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
जालन्याच्या शेतकऱ्यानं घेतलं पैशाचं पीक! एका एकरात 10 लाखांची कमाई, काय केलं? Video
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement