advertisement

Success Story : नोकरीला केला रामराम, काकडी शेतीने उजळले नशीब, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा

Last Updated:

केवळ जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर दयानंद चंद्रकांत ढगे यांनी शाळेतील खडू-फळा सोडून शेतात नांगर धरला आणि अवघ्या 65 दिवसांत काकडीच्या पिकातून लाखांची कमाई करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

+
नोकरीला

नोकरीला ठोकला रामराम, काकडीने उजळले नशीब: शिक्षक बनला लखपती 

सोलापूर : नोकरी मोठी की शेती? या प्रश्नाचे उत्तर मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील एका माजी शिक्षकाने आपल्या कर्तृत्वातून दिले आहे. केवळ जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर दयानंद चंद्रकांत ढगे यांनी शाळेतील खडू-फळा सोडून शेतात नांगर धरला आणि अवघ्या 65 दिवसांत काकडीच्या पिकातून लाखांची कमाई करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
दयानंद ढगे हे एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यातून मिळणारे उत्पन्न कुटुंबाच्या गरजा आणि भविष्यासाठी पुरेसे नव्हते. शेवटी त्यांनी धाडसी निर्णय घेत नोकरी सोडली आणि आपल्या हक्काच्या मातीत सोनं पिकवण्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी केवळ एक एकर जमिनीत आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे ठरवले.
advertisement
दयानंद ढगे यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून डिसेंबर महिन्यात काकडीची लागवड केली. पिकाचे योग्य संगोपन आणि मेहनत घेतल्यामुळे अवघ्या 55 दिवसांत काकडीची काढणी सुरू झाली. दर एक दिवसाआड दीड टन काकडीची तोडणी होत असून हा माल थेट मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो.
सध्या त्यांना प्रति किलो 20 ते 26 रुपयांपर्यंत चांगला भाव मिळत आहे. या प्रयोगासाठी त्यांना साधारण 1 लाख रुपये खर्च आला. मात्र 65 दिवसांच्या या चक्रात सर्व खर्च वजा जाता त्यांना 3 ते 3.50 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. हंगामाच्या अखेरपर्यंत हे एकूण उत्पन्न साडेतीन लाखांच्या घरात जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
advertisement
शिक्षक म्हणून काम करताना मर्यादा होत्या, पण शेतीमध्ये मेहनतीला फळ मिळते हे आज सिद्ध झाले. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्यास शेती हा खरोखरच नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवू शकतो, असा सल्ला माजी शिक्षक दयानंद ढगे यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : नोकरीला केला रामराम, काकडी शेतीने उजळले नशीब, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement