advertisement

BBM6 च्या घरात राकेश-विशाल भिडले; हाणामारीपर्यंत पोहचला वाद, संतापलेल्या बिग बॉसनी सुनावली मोठी शिक्षा!

Last Updated:

Bigg Boss Marathi 6: राकेश आणि विशालचा रुद्रावताप पाहून इतर स्पर्धकांनाही शॉक बसला होता. शोमधील हे दोन तगडे स्पर्धक अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं.

News18
News18
मुंबई : बिग बॉस मराठी ६ चा खेळ आता अशा टप्प्यावर येऊन ठेपला आहे, जिथे प्रत्येक स्पर्धक फक्त फिनाले गाठण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. यासाठी वाट्टेल ते करण्याची स्पर्धकांची तयारी आहे. गेल्या आठवड्यात प्रभू शेळके आणि संकेत पाठक यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून आता फिनालेमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी स्पर्धकांमध्ये चूरस पाहायला मिळत आहे. आजच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला. मात्र, यावेळी राकेश आणि विशालचा रुद्रावताप पाहून इतर स्पर्धकांनाही शॉक बसला होता. शोमधील हे दोन तगडे स्पर्धक अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं.
या आठवड्यात बिग बॉसने 'तिकिट टू फिनाले'साठी एक विशेष टास्क दिला होता. प्रत्येक सदस्याचा फोटो एका टीव्ही स्क्रीनवर होता. ज्याचा टीव्ही फुटणार, त्याचं फिनालेचं स्वप्न धुळीला मिळणार. याच टास्कमध्ये राकेश बापटने अनुश्री आणि विशालच्या नावाचा टीव्ही फोडला. राकेशने विशालला नॉमिनेट करण्याचं कारण सांगताना म्हटलं की, "मला त्याचा गेम पहिल्या दिवसापासून आवडत नाही. मला त्याचा उद्धतपणा आवडत नाही, त्याला तो स्वाभिमान म्हणतो. माझ्याबद्दल तो आजपर्यंत जे बोलला आहे ते मला आवडलेलं नाही. विशाल नेहमी बाहेरच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलतो, जे मला पटत नाही." पण हे ऐकताच विशालचा पारा चढला आणि घरामध्ये एकच वाद सुरू झाला.
advertisement

एकमेकांच्या अंगावर धावून गेले विशाल अन् राकेश

विशाल ओरडून म्हणाला, "तू माझ्या वयाबद्दल बोलतोस ते चालतं का? मग मी तुझ्या डिव्होर्सबद्दल बोलतो." हे ऐकताच शांत मानला जाणारा राकेश ज्वालामुखीसारखा फाटला. दोघांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली आणि परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. हा वाद इतक्या विकोपाला गेला की दोघेही एकमेकांवर धावून गेले. त्यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी बिग बॉसने लगेच हस्तक्षेप करत दोघांना लांब केलं. राकेश यावेळी खूप संतापलेला दिसला. आपल्या एक्स वाइफला वादात आणल्याने राकेशचा राग अनावर झाला होता. सध्या विशाल आणि राकेश यांच्यातील वाद तुफान व्हायरल झाला आहे.
advertisement

'बिग बॉस'ने दिली कठोर शिक्षा

घरातील हिंसाचार पाहून बिग बॉस प्रचंड संतापले. त्यांनी कडक आवाजात आदेश दिला, "राकेश आणि विशाल, तात्काळ लांब व्हा!" इतकंच नाही तर नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दोघांनाही मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आक्रमक झाल्यामुळे आणि वैयक्तिक टिप्पणी केल्यामुळे त्याला 'तिकिट टू फिनाले'च्या शर्यतीतून बाहेर काढण्यात आलं आहे. राकेशनेही शारीरिक बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट करण्यात आलं आहे, तसंच त्याला यापुढील कॅप्टन्सी कार्यातूनही बाद करण्यात आलं आहे.
advertisement
या राड्यामुळे विशाल आणि राकेश या दोघांचंही मोठं नुकसान झालं आहे. आता घरात केवळ अनुश्री माने, तन्वी कोल्ते, सागर कारंडे आणि दीपाली सय्यद यांच्यामध्ये 'तिकिट टू फिनाले'साठी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. विशाल आणि राकेशचा हा वाद 'भाऊचा धक्का'वर रितेश देशमुख कसा हाताळणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM6 च्या घरात राकेश-विशाल भिडले; हाणामारीपर्यंत पोहचला वाद, संतापलेल्या बिग बॉसनी सुनावली मोठी शिक्षा!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement