advertisement

हनुमान जयंती पार्श्वभूमीवर ‎खुलताबादकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Last Updated:

यंदाही 2 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, या पार्श्वभूमीवर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद येथे प्रसिद्ध असे भद्रा मारुती हनुमान मंदिर असून येथे दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. यंदाही 2 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, या पार्श्वभूमीवर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 1 ते 3 एप्रिल दरम्यान जड वाहनांच्या वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
‎‎बदललेले वाहतूक मार्ग असे 
कन्नड, वेरूळ, खुलताबाद, दौलताबादमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने कन्नड, वेरूळ, कसाबखेड फाटा, वरझडी, माळीवाडा, शरणापूर फाटामार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.
advertisement
छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद, खुलताबाद, वेरूळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेड फाटा, वेरूळमार्गे कन्नडकडे जातील.
फुलंब्री, सुलतानपूर, खुलताबाद, वेरूळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेड फाटा, वेरूळमार्गे कन्नडकडे जातील.
‎प्रशासनाने वाहनचालकांना दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, नागरिकांनीही वाहतूक व्यवस्थापनात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
हनुमान जयंती पार्श्वभूमीवर ‎खुलताबादकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement