कोड वर्ड’ उलगडणार खरातचे 'कारनामे',अडीच हजारहून अधिक नंबर सांकेतीक भाषेत
- Published by:Prachi Amale
Last Updated:
खरातनं आपल्या संपर्कात असलेल्या हाय प्रोफाईल व्यक्तींची नावं कोडवर्ड अर्थात सांकेतीक भाषेत लिहिली आहेत.
नाशिक : अशोक खरातच्या भोवतीचं गूढ आता हळू हळू उलगडू लागलंय. खरातनं 1500 कोटींचं साम्राज्य कसं उभं केलं. अनेक महिलांचं लैंगिक शोषण कसं केलं? याचा तपास आता अंतिम टप्प्यात आलाय. पोलीस त्याच्या मोबाईलमधील कोडवर्ड उलगडण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतंय.
भोंदू अशोक खरातच्या एकाएका गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी आता पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. खरातच्या फोनमध्ये त्याच्या सगळ्या कारनाम्याची कुंडली दडली आहे. आणि म्हणूनचं पोलिसांनी खरातच्या फोनमधील माहिती पडताळण्यास सुरुवात केली आहे. पण हे काम काही सोपं नाही. कारण खरातनं आपल्या संपर्कात असलेल्या हाय प्रोफाईल व्यक्तींची नावं कोडवर्ड अर्थात सांकेतीक भाषेत लिहिली आहेत.
advertisement
अनेक बडे राजकारणी आणि प्रशासकिय अधिकारी भोंदू खरातच्या संपर्कात होते. त्यानं या बड्या लोकांसाठी पूजा-अर्चा केल्याचे फोटो सोशल माडियावर पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर खरातनं प्रभावशाली व्यक्तींची नावं कोडवर्डमध्ये लिहिल्याचा पोलिसांना संशय आहे.खरातच्या मोबाईल फोनमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल अडीच हजार फोन नंबर हे कोडवर्डमध्ये लिहिले असल्याचं समोर आलं आहे... त्या बड्या लोकांची नावं उघड होऊ नये म्हणूनचं खरातनं कोडवर्डचा फंडा वापरला होता.
advertisement
अशोक खरातकडं सल्ल्यासाठी जाणाऱ्या नेत्यांची यादी बरीच लांब आहे. बडे प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते भोंदू अशोक खरातच्या चरणी लीन होत असतं.त्यामुळे काही वर्षातचं त्यानं राजकीय वर्तुळात दबदबा निर्माण केली होता. पण आता खरातचं बिंग फुटल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या त्या बड्या धेंडांची पाचावर धारण बसली आहे. कारण खरातशी असलेले संबंध ते नेते आणि बड्या अधिकाऱ्यांच्या मुळाशी येणार आहेत... अशोक खरातच्या मोबाईलमधील कोडवर्डचं रहस्य उलगडण्याचं मोठं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे.
Location :
Nashik [Nasik],Nashik,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 9:46 PM IST









