Thane Traffic Diversion: ठाण्यामध्ये 31 मार्चला महत्त्वाची स्पर्धा, दिवसभर वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
उद्या ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये PRESIDENT CUP INDIA 2026 (ITCSF) स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे ठाणे शहरातील वाहतुकीत बदल झाले आहे.
ठाणे: ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 31 मार्च 2026 रोजी मंगळवारी अर्थात उद्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे PRESIDENT CUP INDIA 2026 (ITCSF) स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यामुळे ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. उद्या क्रिकेटप्रेमींची, राजकीय नेत्यांची आणि अनेक दिग्गज कलाकारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहणार आहेत. त्यामुळे गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवर अवजड वाहनांच्या प्रवेशावर दुपारी 02.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत निर्बंध घातले आहेत.
ठाणेनगर वाहतूक उपविभागाच्या हद्दीत दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे में. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन संस्थेमार्फत 31 मार्च 2026 रोजी PRESIDENT CUP INDIA 2026 (ITCSF) दिवस आणि रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमाला कोअर कमिटीमधील सदस्य व टीम मालक, अभिनेते, नेते आणि इतर मान्यवर तसेच मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग उपस्थित राहणार आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहण्यासाठी सामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे. ठाण्याच्या वाहतूक विभागाच्या पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसुचना जारी केलेली आहे.
advertisement
🚨 वाहतूक सूचना 🚨
दि. 31 मार्च 2026 रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे PRESIDENT CUP INDIA 2026 (ITCSF) स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
मान्यवर व मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करा.
👉 वाहतूक नियमांचे पालन करा.#TrafficAlert #Thane pic.twitter.com/D8SECZy7GK
— ठाणे पोलीस.. Thane Police (@ThaneCityPolice) March 30, 2026
advertisement
छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळवा कडून आणि साकेत रोडने सिडको बस स्टॉपकडे जाणाऱ्या सर्व टी.एम.टी. एन.एम.एम.टी. आणि सर्व प्रकारच्या खाजगी बसेस यांना किकनाका येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे. या मार्गावरील बसेस प्रवाशांना किक नाका येथे सोडून आणि तिथून प्रवाशी इच्छित स्थळी जाऊ शकतील. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळवाकडून, साकेत रोडने एवन फर्निचर व मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या चार चाकी, रिक्षा आणि दुचाकी वाहनांना माता रमाबाई चौकामध्ये "प्रवेश बंद" करण्यात येत आहे. चार चाकी, रिक्षा आणि दुचाकी या वाहनांना माता रमाबाई चौकातून सरळ पुढे जाऊन शितला माता चौक येथून उजवे वळण घेऊन जवाहर बाग आणि एवन फर्निचर मार्गावरून पुढे इच्छित स्थळी जाण्याचा पर्याय आहे.
advertisement
सिडको बस स्टॉपकडून एवन फर्निचरकडे आणि मुख्य बाजारपेठकडे जाणाऱ्या सर्व प्रकाराच्या वाहनांना माता रमाबाई चौक येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे. या मार्गावरील सर्व प्रकाराच्या वाहनांना दादोजी कोंडदेव स्टेडीयम गेट नं. 3 समोरुन गांवदेवी कट आणि पारेख ट्रान्सपोर्ट मार्गे पुढे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. एवन फर्निचर आणि राघोबा शंकर रोडकडून सिडको बस स्टॉप जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जवाहर बाग अग्निशामक केंद्र येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे. या मार्गावरील सर्व प्रकाराच्या वाहनांना जवाहर बाग, अग्निशामक केंद्र येथून उजवीकडे वळून राघोबा शंकर रोड मार्गे पुढे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. उद्या ठाणे शहरामध्ये, जवाहर बाग, अग्निशामक केंद्र ते माता रमाबाई चौक पर्यंत रोडचे उजवे आणि डावे दोन्ही बाजुस तसेच माता रमाबाई चौक ते गांवदेवी कट, महागिरी पर्यंत रोडचे दोन्ही बाजुला वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु हे सर्व वाहतुकीचे नियम, पोलिसांना, फायर ब्रिगेडला, रुग्णवाहिकेला, पोलीस वाहनांना आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 9:48 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Traffic Diversion: ठाण्यामध्ये 31 मार्चला महत्त्वाची स्पर्धा, दिवसभर वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग?









