APMC Market: शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
महाराष्ट्रातील अनेक भागात रब्बी कांद्याची काढणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारातील कांद्याची आवक टिकून होती.
सांगली: महाराष्ट्रातील अनेक भागात रब्बी कांद्याची काढणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारातील कांद्याची आवक टिकून होती. मात्र आज 30 मार्च रोजी राज्याच्या बाजारात कांदा आवकेत घट दिसून आली. 1 लाख 89 हजार 019 क्विंटल कांद्याची एकूण आवक राहिली. यामध्ये लाल कांद्याला नाशिक मार्केटमध्ये 890, नागपूर बाजारात 1331, अमरावती मार्केटमध्ये 1200 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सरासरी दर मिळाला. लाल कांद्याच्या सरासरी भावात आज सुधारणा दिसून आली. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 8935 क्विंटल उन्हाळी कांद्यास मिळालेला 1025 रुपये सरासरी भाव आजचा उन्हाळी कांद्याचा सर्वाधिक बाजारभाव ठरला.
लिंबूची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 996 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 516 क्विंटल लिंबूस 3500 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल कागदी लिंबूस 11833 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
द्राक्ष आवक
राज्याच्या मार्केटमध्ये द्राक्ष आवक स्थिर दिसली. आज 983 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 485 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 6250 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई बाजारात आवक झालेल्या 7 क्विंटल द्राक्षास 11000 प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये केळीची 15 हजार 815 क्विंटल एकूण आवक राहिली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 15580 क्विंटल केळीची सर्वाधिक आवक झाली. त्यास 1410 रुपये बाजारभाव ठरला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 10:03 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?








