Success Story : मालामाल करणारी रताळी शेती, 5 एकरांत 750 क्विंटल उत्पादन, शेतकऱ्याला 8 लाख निव्वळ नफा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जसवंतसिंग शेखावत असे या प्रयोगशील शेतकऱ्यांचे नाव आहे. पाच एकर रताळी शेतीमधून त्यांना 11 लाखांचे उत्पन्न झाले आहे.
जालना : वेगवेगळ्या संकटांमुळे शेती सातत्याने अडचणीत असते. परंतु, वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करून अनेक शेतकरी शेतीला फायदेशीर ठरवतात. कधीकधी शेती करताना अपयश देखील येते. परंतु, सातत्य ठेवले की यश मिळतेच. जालन्यातील लोणगीवच्या एका तरुण शेतकऱ्याने हेच सिद्ध केलेय. जसवंतसिंग शेखावत असे या प्रयोगशील शेतकऱ्यांचे नाव आहे. पाच एकर रताळी शेतीमधून त्यांना 11 लाखांचे उत्पन्न झाले आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील जसवंतसिंग यांनी आपल्या पाच एकर वडीलोपार्जित शेतीत रताळी लागवड केली होती. जून महिन्या 18 तारखेला सरी पाडून लागवड करण्यात आली. चार महिने पावसामुळे पाणी देण्याची आवश्यकता भासली नाही.
advertisement
दाणेदार, युरिया आणि अन्य रासायनिक खतांचा वापर केला. तसेच दोन कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी केली. अति पावसामुळे पिकाच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला. परंतु तरीदेखील एकरी 150 क्विंटलपर्यंत रताळी उत्पादन त्यांना मिळाले.
पाच एकरमध्ये 750 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. या रताळीला 14 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. यापासून 11 लाख रुपये होतील. तीन लाख रुपयांचा खर्च वगळता 8 लाख रुपयांचे निव्वळ उत्पादन झाल्याचे शेखावत यांनी सांगितले. रताळे शेती कमी खर्च आणि अधिक उत्पादन मिळवून देणारी असल्याने अन्य शेतकऱ्यांनी देखील ही शेती करावी असा सल्ला शेखावत यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 11:44 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : मालामाल करणारी रताळी शेती, 5 एकरांत 750 क्विंटल उत्पादन, शेतकऱ्याला 8 लाख निव्वळ नफा









