advertisement

दोन दिवसांनंतर सोन्या चांदीच्या घसरणीला ब्रेक, 22 आणि 24 कॅरेटचे काय आहेत दर?

Last Updated:

चांदीमध्ये पुन्हा एकदा तेजी येईल, असे मानणाऱ्या वर्गाकडे काही ठोस कारणं आहेत. जर मध्यपूर्वेतील तणाव कमी झाला, तर जागतिक बाजारपेठेत डॉलर कमकुवत होईल.

News18
News18
मागच्या दोन दिवसांपासून सोन्या चांदीचे दर घसरत आहेत. मात्र या घसरणीला आता ब्रेक लागला आहे. विकेण्डला सोन्या चांदीचे दर वाढले आहेत. ४ एप्रिलच्या सकाळी सराफा बाजारात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई आणि पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव आता १ लाख ५१ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या सोन्याच्या किमतीत अचानक झालेल्या या वाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव सध्या ४,५९१.५२ डॉलर प्रति औंस इतका प्रचंड वाढला आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेले युद्धजन्य वातावरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण यामुळे सोन्याचे दर वधारले आहेत. तसेच, भारत सरकारने सोन्याच्या आयातीवर (Import) आणलेल्या नवीन निर्बंधांमुळे देशांतर्गत पुरवठा कमी झाला असून, त्याचा थेट परिणाम किमतींवर दिसून येत आहे.
advertisement
सोन्याचे दर दीड लाखाच्या पार गेल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. विशेषतः ज्यांच्या घरात येत्या काही महिन्यांत लग्नकार्य आहे, त्यांना आता दागिन्यांसाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापेक्षा अजून सोन्या चांदीच्या किंमती खाली येतील याची शक्यताच कमी आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेपर्यंत पुन्हा दरवाढ पाहायला मिळू शकते.
advertisement
शहर२४ कॅरेट २२ कॅरेट 
दिल्ली१,५१,०९० १,३८,५१०
मुंबई१,५०,९४० १,३८,३६०
पुणे१,५०,९४०१,३८,३६०
चेन्नई१,५१,१००१,३८,५१०
बेंगळुरू १,५०,९४० १,३८,३६०
कोलकाता१,५०,९४० १,३८,३६०
advertisement
चांदीचे दर पुन्हा वाढणार का?
चांदीमध्ये पुन्हा एकदा तेजी येईल, असे मानणाऱ्या वर्गाकडे काही ठोस कारणं आहेत. जर मध्यपूर्वेतील तणाव कमी झाला, तर जागतिक बाजारपेठेत डॉलर कमकुवत होईल. ऐतिहासिकदृष्ट्या जेव्हा जेव्हा डॉलर स्वस्त होतो, तेव्हा चांदी आणि सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होते.
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह २०२६ मध्ये व्याजदरात कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कमी व्याजदर हे नेहमीच मौल्यवान धातूंसाठी बूस्टर ठरतात. चांदी ही केवळ दागिन्यांसाठी वापरली जाणारी धातू नाही. इलेक्ट्रिक वाहने (EV), सोलर पॅनेल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील उपकरणांमध्ये चांदीचा वापर अनिवार्य आहे. ही मागणी भविष्यात चांदीला सावरू शकते.
view comments
मराठी बातम्या/मनी/
दोन दिवसांनंतर सोन्या चांदीच्या घसरणीला ब्रेक, 22 आणि 24 कॅरेटचे काय आहेत दर?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement