advertisement

Konkan Railway : कोकणात जाण्यासाठी आता पश्चिम रेल्वेचा नवा 'शॉर्टकट'; हा प्रकल्प ठरणार गेमचेंजर

Last Updated:

New Rail Line Plan : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पश्चिम रेल्वेच्या एका प्रकल्पामुळे आता तुम्हाला कोकणात जाणारा प्रवास सोपा होणार आहे.

नायगाव–जुचंद्रा कॉर्ड लाईन प्रकल्पामुळे पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वे यांच्यात थेट जोडणी
नायगाव–जुचंद्रा कॉर्ड लाईन प्रकल्पामुळे पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वे यांच्यात थेट जोडणी
मुंबई : पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वे यांना आता थेट जोडण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णय पश्चिम रेल्वेकडून मांडण्या आला असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यास रेल्वे प्रवासात मोठा बदल होण्याची शक्यत आहे.
मध्य रेल्वेचा वळसा आता विसरा
सध्या कोकण रेल्वेवरील गाड्या या मुख्यतहा मध्य रेल्वे मार्गावरुन चालल्या जातात. मात्र नायगाव-जुचंद्रा हा नवा कॉर्ड लाईन तयारल झाल्यास काही गाड्या या पश्चिम रेल्वे मार्गावरूनही धावू शकतील. सध्या ही लाईन उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला असून यामुळे प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील तसेच प्रवास अधिक सोपा होईल.
advertisement
कोकणवारी आता वांद्रे टर्मिनसवरून
यातील एक विशेष गोष्ट म्हणजे या प्रकल्पामुळे वांद्रे टर्मिनसहून कोकणात थेट जाण्यासाठीचा रेल्वे मार्ग मोकळा होऊ शकतो. सध्या कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी प्रवाशांना विविध स्थानकांवर बदल करावा लागतो. पण यात ही लाईन सुरु झाल्यास थेट कनेक्टिव्हिटी मिळेल.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली शिवाय त्यांनी आर्थिक वर्ष 2025-26 मधील कामगिरीचा आढावा घेताना म्हणाले की, या प्रकल्पामुळे पश्चिम,मध्य आणि कोकण रेल्वेचे जाळे अधिक मजबूत होईल.
advertisement
प्रवासी सेवा नाही,तर या गोष्टीला ही मिळणार गती
1) या नव्या कॉर्ड लाईनमुळे फक्त प्रवासी वाहतुकीलाच नाही तर मालवाहतुकीलाही मोठा फायदा होणार आहे. शिवाय वेगवेगळ्या मार्गांवरील ताण कमी होईल आणि रेल्वे सेवा अधिक जलद बनेल.
2) एवढेच नाही तर रत्नागिरी-दिवा पॅसेंजरसारख्या काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्याचाही एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध होईल, त्यामुळे गाड्यांची वेळ सुधारेल आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Konkan Railway : कोकणात जाण्यासाठी आता पश्चिम रेल्वेचा नवा 'शॉर्टकट'; हा प्रकल्प ठरणार गेमचेंजर
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement