advertisement

निर्जन ठिकाणी बोलावलं, डोळ्यात चटणी टाकली अन्..., छ. संभाजीनगरच्या ‘त्या’ तरुणांचा डाव फसला, दोघे अटकेत

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: लिंक रोडवरील प्रभू हॉटेलच्या मागील निर्जन भागात घडलेल्या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण होते.

डोळ्यात चटणी टाकली अन् ...., झटपट मोठं होण्याचा डाव फसला, छ. संभाजीनगरात ‘ते’ कांड करणारे अटकेत
डोळ्यात चटणी टाकली अन् ...., झटपट मोठं होण्याचा डाव फसला, छ. संभाजीनगरात ‘ते’ कांड करणारे अटकेत
‎छत्रपती संभाजीनगर : कमी वेळात मोठा पैसा मिळवण्याच्या मोहापायी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारणाऱ्या एका टोळीचा सातारा पोलिसांनी भांडाफोड केला. जेवणाची ऑर्डर देण्यासाठी केटरिंग व्यावसायिकाला निर्जन ठिकाणी बोलावून लुटमार केल्याची धक्कादायक घटना छ. संभाजीनगरात घडली होती. 18 मार्च रोजी सायंकाळी 7 ते 8 दरम्यान लिंक रोडवरील प्रभू हॉटेलच्या मागील निर्जन भागात घडलेल्या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण होते. आता या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.
‎या प्रकरणात पवन ज्ञानेश्वर झळके (वय 30) आणि अक्षय कैलास झळके (वय 22) या दोघांना वळदगाव परिसरातून अटक करण्यात आली. याबाबत माहिती निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. तर युवराज ऊर्फ पंड्या मेहेर हा आरोपी अद्याप फरार आहे. ‎सागर प्रकाश सरदार (वय 32, रा. वेदांतनगर) यांनी याबाबत तक्रार नोंदवली होती.
advertisement
सागर सरदार यांना जेवणाच्या ऑर्डरच्या निमित्ताने बोलावले आणि नंतर त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याच्या बाळ्या, मोबाईल फोन आणि रोख 55,900 रुपये असा ऐवज चोरून नेला होता. या प्रकारानंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
‎या गुन्ह्याचा तपास करताना उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, गोविंद एकीलवाले, पोलीस हवालदार दिगंबर राठोड, संदीप चिंचोले आणि पोलीस कर्मचारी दिनेश भुरेवाल यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. आरोपींकडून सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान, ‎जलद पैसा मिळवण्याच्या हेतूने आरोपींनी हा कट रचला होता. शहराजवळील गोलवाडी फाटा आणि लिंक रोड परिसर रात्रीच्या वेळी ओसाड असल्यामुळे त्यांनी हा भाग लुटीसाठी निवडला होता. मात्र, पहिल्याच प्रयत्नात ही टोळी सातारा पोलिसांच्या तावडीत सापडली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
निर्जन ठिकाणी बोलावलं, डोळ्यात चटणी टाकली अन्..., छ. संभाजीनगरच्या ‘त्या’ तरुणांचा डाव फसला, दोघे अटकेत
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement