advertisement

समाजाला धडे द्यायचा, तोच निघाला व्हिलन; मृदंगाचार्याचं काळं कांड कळालं, पत्नीनं स्वत:लाच संपवलं!

Last Updated:
Amol Laghane: अमोल लघाणे हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. त्याच्या प्रबोधनपर व्हिडिओंमुळे लोक त्याला आदर्श मानत होते.
1/7
सोशल मीडियातून समाजाला संस्काराचे धडे देणारा मृदुंगाचार्य अमोल लघाणे याचं खऱ्या आयुष्यातील धक्कादायक कांड समोर आलं. त्यामुळे पत्नी काजल लघाणे हिनं टोकाचं पाऊल उचललं. मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून लग्नानंतर वर्षभरातच तिनं जीवन संपवलं. या घटनेनं छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगाव शेणपुंजी परिसरात खळबळ उडाली आहे.

2/7
काजल आणि अमोल लघाणे यांचा 25 मार्च 2025 रोजी मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. अमोल वारकरी संप्रदायातील असून कीर्तनामध्ये मृदंग वाजवणारा 'मृदंगाचार्य' म्हणून ओळखला जातो. लग्नाच्या दिवशी स्वतः मृदंग वाजवत अमोलने मंडपात प्रवेश केला. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

3/7
सुरुवातीचे काही महिने काजल आणि अमोल यांचा संसार अगदी सुरेल वाटावा असा होता. पण काळ जसजसा पुढे सरकला, तसतसा या नात्यातील सूर विस्कटू लागले. आनंदी आयुष्यावर दु:खाची छाया पडू लागली. संसाराला वर्ष पूर्ण झाले असतानाच काजलने 1 एप्रिल 2026 रोजी राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवली.

4/7
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच अमोलचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे काजलच्या निदर्शनास आले होते. तिने या गोष्टीला विरोध केला असता, अमोलने तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

5/7
काजलला वारंवार शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे असे प्रकार सुरू झाले होते. या छळाबाबत काजलने आपल्या माहेरच्या लोकांनाही कल्पना दिली होती. मात्र, पतीच्या वागण्यात बदल झाला नाही, उलट छळ वाढतच गेला. “माझ्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप केलास तर घराबाहेर काढीन,” अशी धमकी देत होता.

6/7
काजलच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी रांजणगाव शेणपुंजी येथे धाव घेतली. आपल्या मुलीच्या मृत्यूला तिचा पती अमोल लघाणे हाच जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

7/7
दरम्यान, अमोल लघाणे हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. त्याच्या प्रबोधनपर व्हिडिओंमुळे लोक त्याला आदर्श मानत होते. मात्र, ज्या व्यक्तीने समाजाला नीतीमूल्यांचे धडे दिले, त्याच्यावरच अशा प्रकारचे आरोप झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. आता कठोर कारवाईची मागणी होत आहे.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement