advertisement

जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यावर विनयभंगाची तक्रार, पण त्याने भलतंच सांगितलं, पालघरमध्ये नेमकं झालं काय?

Last Updated:

Palghar News : पालघर येथील एका कार्यालयात अल्पवयीन मुलीवर गैरवर्तन झाल्याच्या आरोपानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

शिष्यवृत्तीसाठी गेलेल्या मुलीचा अधिकाऱ्याकडून विनयंभग
शिष्यवृत्तीसाठी गेलेल्या मुलीचा अधिकाऱ्याकडून विनयंभग
पालघर : पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालयात एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या कार्यालयात एका अधिकाऱ्याविरुद्ध अल्पवयीन मुलीने विनयभंगाची तक्रार केलेली आहे. या घटनेप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 28 मार्ज रोजी वसई तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी तिच्या बहिणीसोबत काही शैक्षणिक माहिती आणि शिष्यवृत्ती संबंधित माहिती घेण्यासाठी कार्यालयात गेली होती. दरम्यान त्या वेळी संबंधित अधिकाऱ्याने मुलीला आपला मोबाईल नंबर देत काही दिवसानंतर पुन्हा येण्यासाठी सांगितले होते.
ती मुलगी 1 एप्रिल रोजी पुन्हा बोलवल्याप्रमाणे पुन्हा कार्यालयात गेली. पण तेव्हाच माहिती देण्याच्या बहाण्याने त्या अधिकाऱ्याने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोपी अल्पवयीन मुलीने केलेला आहे. गंभीर बाब म्हणजे या प्रकरणाला मुलीने लगेच विरोध करत कार्यालयात आरडाओरड केली आणि स्वत:चा वाचवण्यासाठी तिने अधिकाऱ्याला कानाखालीही मारल्याचे समजत आहे.
advertisement
कार्यालयात अचानक उडालेल्या या गोंधळामुळे उपस्थित असलेल्या महिला कर्मचारी मध्ये पडल्या. मात्र अल्पवयीन मुलीची त्यांच्यासोबतही झटापट झाल्याची माहिती मिळत आहे. त्यावेळी कार्यालयातील अनेक साहित्य फेकणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या आरोपाखाली त्या मुलीविरोधातच गुन्हा दाखल झालेला असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेंकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र यानिमित्ताने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यावर विनयभंगाची तक्रार, पण त्याने भलतंच सांगितलं, पालघरमध्ये नेमकं झालं काय?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement