advertisement

Suryakumar Yadav : सूर्याच्या डोक्यात 'धुरंधर'चा स्वॉग! बुमराहला रणवीरचा डायलॉग मारला आता भर स्टेजवर दाखवला जलवा, Video

Last Updated:

Suryakumar Yadav dhurandhar Dance Video : "ओयय जस्सी...घर की याद नहीं आई...", हा डायलॉग बोलून सूर्यकुमारनं जसप्रीत बुमराहचं स्वागत केलं होतं. अशातच सूर्याने धुरंधर स्टाईलमध्ये एन्ट्री केलीये.

Suryakumar Yadav dhurandhar Dance Video
Suryakumar Yadav dhurandhar Dance Video
Suryakumar Yadav Recreates fa9la Song : टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव सध्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळतोय. सूर्यकुमार यादव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नसला तरी तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. सूर्यकुमार यादव याने मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये धुरंधरचं वातावरण निर्माण केलं. कधी बुमराहला डायलॉग मारतोय तर कधी रहमान डकैतची एन्ट्री मारतोय. नेमकं सूर्याने काय काय केलं? पाहा

"ओयय जस्सी...घर की याद नहीं आई..."

मुंबई इंडियन्सने केकेआरचा पराभव करून विजयाचं खातं उघडलं होतं. अशातच आता मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याला कारण सूर्यकुमार यादव... सूर्याने ड्रेसिंग रुमचं वातावरण पहिल्या दिवसापासून हलकं फुलकं ठेवलंय. जसप्रीत बुमराहचं जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये आगमन झालं तेव्हा सूर्याने बुमराहला डायलॉग मारला होता. "ओयय जस्सी...घर की याद नहीं आई...", हा धुरंधर 2 मधला डायलॉग बोलून सूर्यकुमारनं जसप्रीत बुमराहचं स्वागत केलं होतं. अशातच सूर्याने धुरंधर स्टाईलमध्ये एन्ट्री केलीये.
advertisement

रहमान डकैतच्या स्टाईलने एन्ट्री

मुंबई इंडियन्सनं एक व्हिडीओ शेअर केलाय, त्या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव एका कार्यक्रमात स्टेजवर एन्ट्री करताना 'धुरंधर' सिनेमात अक्षय खन्नान म्हणजेच रहमान डकैतची हुक स्टेप केली. सूर्याला स्टेजवर बोलवलं जात होतं, एका संगीत कार्यक्रमाला सूर्याने हजेरी लावली होती. त्यावेळी गाणं वाजताच सूर्याने रहमान डकैतच्या स्टाईलने एन्ट्री केली अन् सर्वांचं मन जिंकलं. त्याच्या या व्हिडीओची तुफान चर्चा होताना दिसत आहे.
advertisement

जर सूर्या इम्पॅक्ट प्लेयर नसेल तर मग कोण?

दरम्यान, पहिल्या आयपीएल सामन्यात सूर्यकुमार यादवला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरवलं होतं. त्याला काहीसा दुखापतीचा सामना करावा लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. अशातच आता सूर्याला आगामी सामन्यात देखील हीच भूमिका बजावावी लागू शकते. जर सूर्या इम्पॅक्ट प्लेयर नसेल तर ही भूमिका कुणाला दिली जाईल, हा मोठा प्रश्न आहे. रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, तिलक वर्मा वळगता चौथा प्लेयर कोण? जो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळेल, असा सवाल विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : सूर्याच्या डोक्यात 'धुरंधर'चा स्वॉग! बुमराहला रणवीरचा डायलॉग मारला आता भर स्टेजवर दाखवला जलवा, Video
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement