advertisement

बाप कॅप्टन तर पोरगा 'कॅप्टन कूल', मुलानेच अशोक खरातला आणलं गोत्यात, एका उत्तराने फासे फिरणार?

Last Updated:

राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा गुंता आता अधिकच जटील होत चालला आहे. आता मुलामुळे अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ashok kharat son news
ashok kharat son news
नाशिक: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा गुंता आता अधिकच जटील होत चालला आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT) सुरू असलेल्या चौकशीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून खरातच्या मुलाची एसआयटीकडून कसून चौकशी केली जात आहे.
मात्र त्याच्याकडून माहिती काढून घेणं, पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. तो प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर देत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्याने दिलेल्या एका कबुली जबाबामुळे अशोक खरातबाबतचा संशय वाढत चालला आहे. मुलामुळेच अशोक खरात आणखी गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'जे काही आहे ते डॅडला माहिती'

मिळालेल्या माहितीनुसार, खरातच्या मुलाची महाराष्ट्र पोलीस अकादमी (MPA) येथे चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी जेव्हा त्याला आर्थिक व्यवहारांबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने एकच 'टेप' लावल्याचं पाहायला मिळाले. "जे काही आहे ते डॅडला माहिती," असं म्हणत त्याने स्वतःला या प्रकरणातून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रश्नांचा भडिमार सुरूच राहिल्यावर त्याने एक महत्त्वपूर्ण कबुली दिली.
advertisement

घरात येत होती मोठी 'कॅश', खरातच्या मुलाची कबुली

अशोक खरातच्या मुलाने कबूल केले आहे की, त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कॅश येत असे. या कबुलीमुळे पोलिसांचे संशयाची सुई आता हवाला रॅकेटकडे वळली आहे. एखादा भोंदूबाबा एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कोठून आणि कोणासाठी जमा करत होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या रॅकेटचे जाळे केवळ एका शहरापुरते मर्यादित नसून ते राज्यभर पसरलेले असण्याची दाट शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
advertisement

मौन की पूर्वनियोजित कट?

चौकशीदरम्यान खरातच्या मुलाचा संयम पाहून पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहेत. उलटसुलट प्रश्नांची सरबत्ती करूनही तो अनेकवेळा मौन बाळगत आहे. यामुळे मुलगा जाणीवपूर्वक वडिलांच्या काळ्या कृत्यांवर पांघरूण घालत आहे का? पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा तपासाची साखळी तोडण्यासाठी खरातने मुलाला आधीच काही सूचना दिल्या होत्या का? हे सर्व पूर्वनियोजित कटानुसार सुरू आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सध्या पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. मुलाच्या कबुली जवाबामुळे खरातच्या अडचणी वाढू शकतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
बाप कॅप्टन तर पोरगा 'कॅप्टन कूल', मुलानेच अशोक खरातला आणलं गोत्यात, एका उत्तराने फासे फिरणार?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement