advertisement

Weather Alert: शुक्रवारी धोक्याचा अलर्ट! महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांवर संकट, या भागात गारपीट होणार

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रावर अवकाळी संकट कायम आहे. आज पुन्हा 20 जिल्ह्यांना वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
1/7
ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात वादळी पावसाचं धुमाकूळ सुरू आहे. सोसाट्याचा वारा, विजांसह पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आता पुन्हा हवामान विभागाच्या इशाऱ्याने टेन्शन वाढवलं आहे. आज, 3 एप्रिल रोजी देखील महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट कायम असणार आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना ऑरेंज तर 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

2/7
कोकणात मार्चअखेरपासूनच वादळी पाऊस सुरू होता. आज मात्र मुंबईसह कोकणातील पावसाची तीव्रता कमी होणार आहे. आज ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल. मात्र, कोणत्याही जिल्ह्याला धोक्याचा इशारा नाही. कमाल तापमान 35-35 अंशांच्या दरम्यान राहील.

3/7
मध्य महाराष्ट्रातील पुण्यात गुरुवारी वादळी पावसाने कहर केला. आज पुन्हा पुण्यासह सोलापूर परिसरात ताशी 40-50 किमी वेगवान वाऱ्यांसह पाऊस आणि गारपीट होईल. या दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात देखील विजांसह तुरळक पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगरला आज वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.

4/7
उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचं तुफान येण्याची शक्यता आहे. ताशी 30-60 किमी वेगाने वारे वाहणार असून नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यांना यलो, तर जळगावला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात कमाल तापमान 33-38 अंशांपर्यंत जाईल.

5/7
मराठवाड्यावर अवकाळी संकट कायम आहे. आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली या 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. तर उर्वरित लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट कायम आहे.

6/7
विदर्भात देखील आज अवकाळी पावसाचा इशारा कायम आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट असेल. अशातच उन्हाचा पारा देखील चढाच राहणार असून कमाल तापमान 36-40 अंशांच्या दरम्यान राहील.

7/7
दरम्यान, अवकाळी संकट पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे फळबागा, भाजीपाला आणि रब्बी पिकांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे पिकांच्या संरक्षणासाठी काळजी घ्या. वादळी वारे, विजा आणि पावसामुळे वाहतूक, विजेच्या तारांना आणि छतांना धोका असून बाहेर जाणाऱ्यांनी देखील सावध राहावे.

बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?

  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement