IPL 2026 : मुजरबानीने मेहनतीने 4 विकेट घेऊन पर्पल कॅप मिळवली, पण दोन तासाच ती हिसकावली, कुणी बाजी मारली?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कोलकत्ताच्या एका खेळाडूकडून पर्पल कॅप हिसकावली आहे.विशेष म्हणजे ही पर्पल कॅप त्याच्याकडून दोन तासात हिसकावली आहे.त्यामुळे नेमकं काय घडलं आहे?हे जाणून घेऊयात.
KKR vs SRH : आयपीएलच्या आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 65 धावांनी कोलकत्ता नाईट रायडर्सचा पराभव केला आहे.सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 226 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकत्ता नाईट रायडर्स 161 धावांवर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे कोलकत्ता या सामन्यात हारली होती.या हाराकिरीसोबत कोलकत्ताला आणखी एक झटका बसला आहे. कारण कोलकत्ताच्या एका खेळाडूकडून पर्पल कॅप हिसकावली आहे.विशेष म्हणजे ही पर्पल कॅप त्याच्याकडून दोन तासात हिसकावली आहे.त्यामुळे नेमकं काय घडलं आहे?हे जाणून घेऊयात.
खरं तर या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 8 विकेट गमावून 226 धावा ठोकल्या होत्या. यावेळी कोलकत्ताकडून ब्लेसिंग मुजरबानीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या होत्या. तर वैभव अरोराने 2 आणि कार्तिक त्यागी आणि अनुकूल रॉयने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. या सामन्यात ब्लेसिंग मुजरबानीने मेहनतीने 4 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे तो सर्वाधिक विकेट टेकर गोलंदाज बनला होता. त्यामुळे त्याला सनरायझर्स हैदराबादच्या इनिंग नंतर पर्पल कॅप दिली गेली होती. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. पण दुसऱ्याच इनिंगला त्याच्याकडून ही कॅच हिसकावली.
advertisement
त्याचं झालं असं की कोलकत्ता हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना जयदेव उनाडकटने तीन बहुमुल्य विकेट काढल्या होत्या. त्यामुळे उनाडकटच्या दोन सामन्यातील विकेटची संख्या ही चार झाली होती.तर मुजरबानीच्या खात्यात देखील दोन सामन्यात ४ विकेट होत्या.पण उनाडकटने फक्त ६ ओव्हरमध्ये या विकेट काढल्याने त्याला पर्पल कॅप दे्ण्यात आली होती. त्यामुळे दोनच तासात उनाडकटने मुजरबानीकडून पर्पल कॅप हिसकावली होती.
advertisement
कोलकत्ताने कुठे मॅच हारली?
हैदराबादने दिलेल्या 226 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकत्ताने आक्रामक सूरूवात केली होती.पॉवरप्लेमध्ये कोलकत्ताने 3 विकेट गमावून 74 धावा केल्या होत्या. त्यामुळे तुलनेत चांगली सूरूवात झाली होती.पण सामन्यात पुढे दोन बॉलने मोठा गेम केला. पॉवरप्लेच्या शेवटच्या बॉलवर मोठा ड्रामा झाला होता. ईशानने टाकलेल्या बॉलवर रघुवंशी स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता,मात्र ईशाने तो पायाने अडवून रनआऊट केला होता. या दरम्यान ज्यावेळेस रनआऊट झाला तेव्हा दोन्ही खेळाडू एकमेकांच्या आजूबाजूला उभे ठाकले होते.पण अंपायरने कॅमरन ग्रीनला रनआऊट दिले होते.
advertisement
या रनआऊटनंतर 11 व्या ओव्हरला अंगक्रिश रघुवंशी रनआऊट झाला होता. खरं तर रिंकूने मारलेला बॉल खेळाडूच्या हातात गेला होता,त्यामुळे रन काढण्याची आवश्यकताच नव्हती.पण रघुवंशी घाईघाईत पळाला आणि रनआऊट होऊन बसला.रघुवंशी 29 बॉलमध्ये 52 धावा करून बाद झाला होता. जर तो मैदानात टीकता आला असता आणि त्याच्या सोबत कॅमरन ग्रीन देखील खेळला असता तर सामना नक्कीच अटीतटीचा झाला असता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 2:25 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मुजरबानीने मेहनतीने 4 विकेट घेऊन पर्पल कॅप मिळवली, पण दोन तासाच ती हिसकावली, कुणी बाजी मारली?









