advertisement

IPL 2026 : 68 हजार लोक बघतच राहिले... इशान किशनसारखी चूक गल्ली क्रिकेटरही करणार नाही!

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये केकेआरचा लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये लाजिरवाणा पराभव झाला आहे. मुंबईविरुद्धचा पहिला सामना 6 विकेटने गमावल्यानंतर आता केकेआरचा हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तब्बल 65 रननी पराभव झाला आहे.

68 हजार लोक बघतच राहिले... इशान किशनसारखी चूक गल्ली क्रिकेटरही करणार नाही!
68 हजार लोक बघतच राहिले... इशान किशनसारखी चूक गल्ली क्रिकेटरही करणार नाही!
कोलकाता : आयपीएल 2026 मध्ये केकेआरचा लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये लाजिरवाणा पराभव झाला आहे. मुंबईविरुद्धचा पहिला सामना 6 विकेटने गमावल्यानंतर आता केकेआरचा हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तब्बल 65 रननी पराभव झाला आहे. हैदराबादने दिलेल्या 227 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा 16 ओव्हरमध्ये 161 रनवर ऑलआऊट झाला. सनरायजर्स हैदराबादचा या सामन्यात विजय झाला असला तरी खराब फिल्डिंग आणि खराब डीआरएसमुळे हैदराबादच्या टीमवर टीकाही होत आहे.

एकाच ओव्हरमध्ये 3 मिस फिल्ड

या सामन्यात पदार्पण करणाऱ्या शिवांग कुमारच्या बॉलिंगवर हैदराबादच्या फिल्डरनी एकाच ओव्हरमध्ये 3 वेळा खराब फिल्डिंग केली. यातल्या दोन मिस फिल्डिंगवर 2 फोर आणि एका मिस फिल्डिंगवर 3 अशा 11 रन आल्या. केकेआरला हर्ष दुबे आणि रिंकू सिंग यांच्या मिस फिल्डिंगवर दोन फोर तर पेनच्या मिस फिल्डिंगवर 3 रन मिळाल्या.
advertisement

सगळ्यात खराब डीआरएस

या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशन याने यंदाच्या आयपीएलमधला सगळ्यात खराब डीआरएस घेतला. नवव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला हा डीआरएस घेण्यात आला. शिवांग कुमारच्या बॉलवर केकेआरच्या अंगक्रिश रघुवंशीने खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॉल विकेट कीपर इशान किशनच्या हातात गेला आणि त्याने अपील केली. अंपायरने नॉट आऊट दिल्यानंतर इशान किशनने डीआरएस घेतला, त्यामुळे निर्णय थर्ड अंपायरकडे गेला.
advertisement
इशान किशनने घेतलेला हा डीआरएस इतका खराब होता की थर्ड अंपायरने बॉल बॅटला लागला का नाही, हे पाहण्यासाठी बॉल ट्रॅकिंगची मदतही घेतली नाही आणि मैदानातल्या अंपायरचा निर्णय कायम ठेवला. इडन गार्डनच्या मोठ्या स्क्रीनवर डीआरएसचा रिप्ले दाखवला गेल्यामुळे हैदराबादचा कर्णधार इशान किशन याचीही सगळ्यांसमोर फजिती झाली.

केकेआरचा ऑलआऊट

हैदराबादच्या 227 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या केकेआरचा 16 ओव्हरमध्ये 161 रनवर ऑलआऊट झाला. केकेआरकडून अंगक्रिश रघुवंशीने सर्वाधिक 52 रन केल्या तर रिंकू सिंगने 35 आणि फिन ऍलनने 7 बॉलमध्ये 28 रनची खेळी केली. हैदराबादकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर इशान मलिंगाला 2 आणि नितीश रेड्डीला 2 विकेट मिळाल्या.
advertisement
या सामन्यात केकेआरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 226/8 पर्यंत मजल मारली. हेनरिक क्लासेनने 35 बॉल 52, अभिषेक शर्माने 21 बॉल 48, ट्रेव्हिस हेडने 21 बॉल 46 रन केले. केकेआरकडून ब्लेसिंग मुझरबानीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर वैभव अरोराला 2, कार्तिक त्यागीला 1 आणि अनुकूल रॉयला 1 विकेट मिळाली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 68 हजार लोक बघतच राहिले... इशान किशनसारखी चूक गल्ली क्रिकेटरही करणार नाही!
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement