advertisement

IPL 2026: पॉवरप्लेच्या शेवटच्या बॉलला मोठा ड्रामा, OUT देताना अंपायरही बुचकाळ्यात पडले, VIDEO

Last Updated:

पॉवरप्लेमध्ये कोलकत्ताने 3 विकेट गमावून 74 धावा केल्या होत्या.त्यामुळे सर्वकाही सूरळीत चाललं होतं.पण पॉवरप्लेच्या शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला मोठा ड्रामा झाला होता.

Camron green run out drama angkrish rughuvanshi shivang kumar
Camron green run out drama angkrish rughuvanshi shivang kumar
Kolkatta Knight Riders vs Sunrises Hyderabad : आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबादने कोलकत्ता नाईट रायडर्स समोर 227 धावांचं भलं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकत्ताने देखील आक्रामक सूरूवात केली होती. पण पॉवरप्लेच्या शेवटच्या बॉलला मोठा ड्रामा झाला आहे. हा ड्रामा कदाचित कोलकत्ता नाईट रायडर्सच्या पराभवाला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
कोलकत्ताने लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली होती. पॉवरप्लेमध्ये कोलकत्ताने 3 विकेट गमावून 74 धावा केल्या होत्या.त्यामुळे सर्वकाही सूरळीत चाललं होतं.पण पॉवरप्लेच्या शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला मोठा ड्रामा झाला होता.
सनरायझर्स हैदराबादकडून ईशान मलिंगाने पॉवरप्लेची शेवटची ओव्हर टाकायला आला होता. यावेळी अंगक्रिश रघुवंशीला शेवटचा बॉल ईशान मलिंगाने टाकला होता.यावेळी अंगक्रिश रघुवंशीने स्ट्रेट डाईव्ह मारला होता. हा बॉल मारताच कॅमरन ग्रीनने क्रिज सोडलं आणि अंगक्रिश रघुवंशी देखील क्रिज सोडून बाहेर आला. इतक्यात ईशान मलिंगाने चपळाईने बॉल पायाने अडवत रनआऊट केले. हा रनआऊट होताच अंगक्रिश रघुवंशी पव्हेलियनच्या दिशेने जात होता.
advertisement
अंगक्रिश रघुवंशी बाऊंन्ड्री लाईनवर पोहोचताच त्याचा फोर्थ अंपायरच्या निकालासाठी थांबवण्यात आले होते.यावेळी रिप्लेमध्ये अंगक्रिश रघुवंशी आणि कॅमरन ग्रीन हे रनआऊट होत असताना दोघेही पिचवर एकमेकांच्या बाजूला होते. कोणीही एक पाऊल पुढे नाही आणि मागे नाही.त्यामुळे आऊट कुणायला द्यायचं यावर अंपायर बूचकळ्यात पडले होते.पण नंतर कॅमरन ग्रीनला रनआऊट देण्यात आले होते.त्यामुळे तो 2 धावांवर रनआऊट झाला होता. आणि मग पव्हेलियनकड गेलेला अंगक्रिश रघुवंशी फलंदाजीला आला होता. पुढे जाऊन तो 29 बॉलमध्ये 52 धावांची खेळी करून बाद झाला होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026: पॉवरप्लेच्या शेवटच्या बॉलला मोठा ड्रामा, OUT देताना अंपायरही बुचकाळ्यात पडले, VIDEO
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement