Tata चं मार्केट करणार जाम, Maruti आणतेय 40 किमी मायलेजदार SUV, पहिल्यांदाच असं घडणार!
- Published by:Sachin S
Last Updated:
मारुतीने यासाठी पहिल्यांदाच स्वबळावर ही टेक्नॉलॉजी तयार केली आहे. त्यामुळे ही एसयूव्ही तब्बल ४० किमी मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे.
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आता लवकरच एक दमदार आणि मायलेजमध्ये सगळ्या जबरदस्त अशी एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. मागील काही वर्षांपासून मारुती सुझुकी या एसयूव्हीवर काम करत आहे. मारुतीने यासाठी पहिल्यांदाच स्वबळावर ही टेक्नॉलॉजी तयार केली आहे. त्यामुळे ही एसयूव्ही तब्बल ४० किमी मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. या एसयूव्हीचं नाव आहे Maruti Fronx Hybrid.
advertisement
Maruti Fronx Hybrid वर मारुती सुझुकी मागील वर्षभरापासून काम करत आहे. २०२५ मध्ये दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये Maruti Fronx Hybrid झलक पाहण्यास मिळाली होती. सध्या मार्केटमध्ये Maruti Fronx ही पेट्रोल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. पण, आता हायब्रिडच्या स्वबळावरचा प्रयोग मारुती या एसयूव्हीमध्ये करत आहे. या कारची टेस्टिंग सुद्धा सुरू झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
सुझुकी मोटर कॉर्पोरेशन आधीच नेक्स्ट जनरेशन 48V सुपर एने-चार्ज (SEC) हायब्रिड सिस्टीमवर काम करत आहे, जी हलक्या आणि किफायतशीर वाहनांसाठी डिझाइन केलेली आहे. Maruti Fronx Hybrid मध्ये नवीन १.२-लिटर पेट्रोल हायब्रिड इंजिन येणार आहे. तसंच यामध्ये फ्लेक्स-फ्युएल आणि CNG व्हेरियंट सुद्धा पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे ४० किमी मायलेजचा दावा कंपनीने केला आहे.
advertisement
Maruti Fronx Hybrid मध्ये सेफ्टीवर सुद्धा भर दिला जाणार आहे. नवीन Fronx Hybrid एका मजबूत प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे. Maruti Fronx Hybrid ला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेच पाहिजे, असा प्रयत्न कंपनी करणार आहे. तसंच या एसयूव्हीमध्ये ६ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि क्रॅश प्रोटेक्शन सारखे फिचर्स मिळणार आहे.
advertisement
Maruti Fronx Hybrid चा लूकही थोडा वेगळा पाहण्यास मिळणार आहे. यामध्ये फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर सध्या सगळ्याच एसयूव्हीमध्ये मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल क्लस्टर आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी फिचर्स दिले जात आहे, हेच फिचर्स Maruti Fronx Hybrid मध्ये पाहण्यास मिळणार आहे. ही एसयूव्ही या वर्षाच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे.







