advertisement

क्रूरतेची सीमा! सकाळी कॉलेजला गेलेली निलम सायंकाळी मृतावस्थेत सापडली; अंगावरच्या जखमा पाहून सासवड हादरलं

Last Updated:

नीलम ही नेहमीप्रमाणे १ एप्रिल रोजी सकाळी महाविद्यालयात गेली होती. मात्र, सायंकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तिचा कोणताही पत्ता लागला नाही.

तरुणीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय (प्रतिकात्मक फोटो)
तरुणीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुरंदरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी खुनासह अत्याचार आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पुरंदर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
नीलम गायकवाड (वय २२, रा. माळशिरस) असे मृत तरुणीचे नाव आहे. नीलम ही नेहमीप्रमाणे १ एप्रिल रोजी सकाळी महाविद्यालयात गेली होती. मात्र, सायंकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तिचा कोणताही पत्ता लागला नाही. रात्री उशिरा पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालय गाठले, जिथे नीलमचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सासवडजवळील खानवडी गावाच्या हद्दीत घडली आहे. नीलमच्या मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या असून, तिचा गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अनिकेत विष्णू जाधव (रा. माळशिरस) याने नीलमवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे.
सासवड पोलिसांनी या प्रकरणी अनिकेत विष्णू जाधव याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तपास पथके रवाना केली असून, आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
advertisement
या घटनेमुळे महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा जलदगतीने तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
क्रूरतेची सीमा! सकाळी कॉलेजला गेलेली निलम सायंकाळी मृतावस्थेत सापडली; अंगावरच्या जखमा पाहून सासवड हादरलं
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement