शिडीवरून पाय घसरला अन् सगळं संपलं; 22 वर्षीय विजयसोबत खडकवासला धरणाच्या पात्रात भयंकर घडलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
विजय कुमार हा आपल्या बुलडोझरवर चढत असताना अचानक शिडीवरून त्याचा पाय घसरला. तो थेट नदीपात्रातील खोल पाण्यात कोसळला
पुणे : हवेली तालुक्यातील वरदाडे येथे खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडली. यात पुलाचे काम सुरू असताना एका २२ वर्षीय ऑपरेटरचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला आहे. विजय कुमार (वय २२, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो रिंगरोडच्या कामावर बुलडोझर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली.
नेमकी घटना काय?
वरदाडे येथे सध्या रिंगरोडसाठी पुलाचे काम सुरू आहे. विजय कुमार हा आपल्या बुलडोझरवर चढत असताना अचानक शिडीवरून त्याचा पाय घसरला. तो थेट नदीपात्रातील खोल पाण्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले. मात्र दुर्दैवाने त्याचा जीव वाचू शकला नाही.
सुरक्षेचा अभाव ठरला जीवघेणा
या घटनेत सुरक्षेच्या नियमांकडे मोठे दुर्लक्ष झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काम करत असताना विजयने कोणत्याही प्रकारचे लाईफ जॅकेट किंवा सुरक्षात्मक साधने वापरली नव्हती. कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेली इतर सुरक्षितता साधने उपलब्ध नसल्याचे किंवा ती वापरली जात नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
advertisement
विजय कुमार हा कामाच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास होता. त्याच्या निधनामुळे उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, संबंधित कंत्राटदाराकडून सुरक्षेचे नियम पाळले जात होते का, याचा तपास हवेली पोलीस करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 2:10 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
शिडीवरून पाय घसरला अन् सगळं संपलं; 22 वर्षीय विजयसोबत खडकवासला धरणाच्या पात्रात भयंकर घडलं









