advertisement

अपघाताचा बनाव रचून ठार मारण्याचा कट, माजी मंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

Last Updated:

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर खुनाचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18
News18
संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती: राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर खुनाचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांना अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

तक्रारदार अभिजित दिवाकरराव तायडे (वय ४०) यांनी याप्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. अभिजित तायडे हे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे सख्खे बंधू आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी शुभम उर्फ गोलू माहोरे यांनी मिळून अभिजित तायडे यांच्या हत्येचा कट आखला होता. घातपात घडवून हा एक अपघात आहे, असा बनाव करून त्यांना संपवण्याचा हा प्रयत्न होता, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
advertisement

ऑडिओ रेकॉर्डिंगने उडाली खळबळ

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे एक मोबाईल रेकॉर्डिंग. अभिजित तायडे यांनी पोलिसांना या कथित कटाबाबतच्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग एका पेनड्राईव्हमध्ये देऊन सुपूर्द केली आहे. या रेकॉर्डिंगमध्ये खुनाचा कट कसा अमलात आणायचा, याबाबतचे संभाषण असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी हा पेनड्राईव्ह जप्त केला असून पुढील तपासासाठी तो फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आला आहे.
advertisement

गुन्ह्याचे स्वरूप आणि कलमे

चांदूर बाजार पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बच्चू कडू आणि गोलू माहोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ५५, ५८, आणि ६१ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू आणि तायडे कुटुंब यांच्यात मोठा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आमदार प्रवीण तायडे यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा उल्लेखही या तक्रारीत करण्यात आला आहे. राजकीय वैमनस्यातून हा कट रचला गेला की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अपघाताचा बनाव रचून ठार मारण्याचा कट, माजी मंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement