6 वर्षांची चिमुरडी अन् आजीचा खून, आळंदीतील त्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, मध्यरात्री मिस्त्री घरात घुसला अन्...अटक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
बुधवारी रात्री संगीता घरी नसताना विनायकने घरात प्रवेश केला. त्याने प्रथम मंगल शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हे पाहून धनश्रीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली
पुणे : तीर्थक्षेत्र आळंदी जवळील केळगाव-हनुमानवाडी परिसरात बुधवारी रात्री एका वृद्धेची आणि चिमुरडीची निर्घृण हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावत आळंदी पोलिसांनी विनायक तुकाराम भवारी (वय ३२, रा. सिन्नर) याला आळेफाटा येथून ताब्यात घेतले आहे. घरगुती वाद आणि घरात येण्यास होणारा विरोध या रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली दिली आहे.
नेमकी घटना काय?
मयत धनश्री केदारी (वय ६) आणि तिची देखभाल करणाऱ्या मंगल शिंदे (वय ७९) या घरी असताना हा प्रकार घडला. फिर्यादी संगीता केदारी या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. आरोपी विनायक भवारी हा मिस्त्री काम करतो. दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून संगीता आणि विनायक यांची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता. मात्र, काही दिवसातच त्यांच्यात खटके उडू लागले.
advertisement
पोलीस तपासात समोर आलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. विनायक भवारी हा वारंवार घरी येत असे, मात्र मयत मंगल शिंदे त्याला जाब विचारत होत्या. ६ वर्षांची चिमुरडी धनश्री देखील विनायकला "घरात येऊ नको" असे सांगत होती. यामुळे विनायकच्या मनात राग धुमसत होता.
बुधवारी रात्री संगीता घरी नसताना विनायकने घरात प्रवेश केला. त्याने प्रथम मंगल शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हे पाहून धनश्रीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली, तेव्हा रागाच्या भरात विनायकने तिचाही गळा आवळून खून केला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. बी. नरके आणि क्राईम ब्रँचच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या आधारे आरोपी सिन्नरच्या दिशेने पळत असल्याचे समजले. पोलिसांनी पाठलाग करून अवघ्या ५ तासांत त्याला आळेफाटा येथून जेरबंद केले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 1:43 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
6 वर्षांची चिमुरडी अन् आजीचा खून, आळंदीतील त्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, मध्यरात्री मिस्त्री घरात घुसला अन्...अटक










