हा माझा नवराच...! 'धुरंधर 2' मध्ये संजय दत्तला पाहताच भाळली खऱ्या चौधरी अस्लमची बायको; पण व्यक्त केली एक नाराजी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Real Chaudhry Aslam Wife on Sanjay Dutt : धुरंधर 2 मध्ये संजय दत्तची चौधरी अस्लमची भूमिका पाहिल्यानंतर खऱ्या आयुष्यातील चौधरी अस्लमची बायको नौरीननने प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
"मी थोडीच फिल्म पाहिली. मी फक्त तोच भाग पाहिला जिथं स्फोट होतो. जेव्हा संजय दत्त गाडीजवळ असतो आणि वर पाहतो, तेव्हा क्षणभर तो मला माझा नवरा चौधरी अस्लम असल्यासारखा वाटला. संजय दत्तचा चेहरामोहरा आणि हावभाव चौधरी अस्लम यांच्या व्यक्तिरेखेला अगदी साजेसे होतं. चौधरी अस्लमला संजय दत्त खूप आवडायचा आणि मलाही तो खूप आवडतो", असं ती म्हणाली
advertisement
पुढे नौरीनने चौधरी अस्लमचा मृत्यू कसा झाला तेसुद्धा सांगितलं आहे. ती म्हणाली, "पोलिसांना जी कामं जमली नाहीत, ती सर्व कामं अस्लमने पूर्ण केली. 2014 मध्ये एका आत्मघाती हल्ल्यात चौधरी अस्लमची हत्या झाली. 125 किलो स्फोटकांनी भरलेली एक कार त्याच्या गाडीला धडकली होती. या हत्येची जबाबदारी टीटीपीने स्वीकारली होती"
advertisement
संजय दत्तच्या पात्राचं आणि अभिनयाचं कौतुक करत असताना दुसरीकडे नुरीनने निराशाही व्यक्त केली आहे. "चित्रपटाच्या निर्मात्यांनी चौधरी अस्लम यांचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर अधिक संतुलितपणे सादर करण्यासाठी त्यांच्याकडून, पोलिसांकडून किंवा पत्रकारांकडून सल्ला घ्यायला हवा होता", असं ती आज तक रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.







