advertisement

जोतिबाच्या नावानं चांगभल! गुलालाने माखलेला खोबऱ्याचा तुकडा, त्यावरच साकारला दख्खनचा राजा, Video

Last Updated:

Jotiba Yatra 2026: गुलालाने रंगलेल्या खोबऱ्याच्या तुकड्यावर जोतिबा देव म्हणजेच केदारनाथाची प्रतिमा अत्यंत बारकाईने रेखाटली आहे.

+
जोतिबाच्या

जोतिबाच्या नावानं चांगभल! गुलालाने माखलेला खोबऱ्याचा तुकडा, त्यावरच साकारला दख्खनचा राजा, Video

सांगली: दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेचा उत्साह वाडी रत्नागिरीवर सुरु आहे. गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण आणि 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात यात्रेला पौर्णिमेपासून सुरुवात झाली आहे. हजारो भाविकांच्या उत्साहामध्ये काही कलाकार आपली भक्ती कलेच्या माध्यमातून व्यक्त करतात. यापैकीच कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील योगेश मोरे साकारलेली विशेष कलाकृती लोकल18 च्या माध्यमातून पाहूयात.
गुलालाने रंगलेल्या खोबऱ्याच्या तुकड्यावर जोतिबा देव म्हणजेच केदारनाथाची प्रतिमा अत्यंत बारकाईने रेखाटली आहे. विशेष बाब म्हणजे प्रत्यक्ष जोतिबा मंदिरातील पालखीवर आणि सासनकाठीवर उधळण्यात आलेल्या खोबऱ्याच्या तुकड्याचाच त्यांनी कॅनव्हास म्हणून वापर केला आहे. अवघ्या अडीच ते तीन सेंटीमीटर लहान आकारातील हे चित्र ॲक्रेलिक पोस्टर कलरच्या माध्यमातून अडीच तासात पूर्ण केल्याचे चित्रकार योगेश मोरे यांनी लोकल18सोबत बोलताना सांगितले.
advertisement
जोतिबा देव हा मराठी जनतेचे लोकदैवत आहे. जोतिबा डोंगरावरील मंदिराचे आध्यात्मिक, पौराणिक आणि लोकजीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. लोककथेनुसार, जोतिबाने रत्नासूर व मल्लासूर या राक्षसांचा संहार केला. त्या युद्धात त्याच्या मदतीला म्हाळसा आणि बनाई या त्याच्या पत्नीही होत्या. जोतिबाला केदारेश्वर, वाघ्या देव, म्हाळसाचा पती असे विविध नावांनी ओळखले जाते. या दैवताचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लढवय्ये रूप. तलवार हातात असलेला, राक्षसांशी झुंजणारा आणि भक्तांचे रक्षण करणारा हा देव म्हणून त्याची उपासना होते.
advertisement
अशी आहे दख्खनच्या राजाची मुख्य मूर्ती
जोतिबाला ‘दख्खनचा राजा’ म्हणून ओळखले जाते. जोतिबाची मुख्य मूर्ती ही सुमारे 4 फूट 3 इंच उंचीची असून ती काळ्या पाषाणात घडवलेली आहे. चतुर्भुज असणारी ही मूर्ती डावा पाय किंचित पुढे टाकलेल्या स्थितीत आहे. मूर्तीच्या उजव्या हातात खड्ग, वर डमरू, डावीकडे त्रिशूल आणि खाली अमृत पात्र आहे, तर कमरेला पंचा असून गळ्यात कंठहार आहे. माथ्याला नऊ वेटोळ्यांची जटा आहे. मूर्तीच्या हातामध्ये कडे आणि पायांत तोडे असून कानात नाथपंथी गोल कुंडले आहेत.
advertisement
विशेष म्हणजे चित्रकार योगेश मोरे यांनी देखील हुबेहूब अशीच मूर्ती गुलालाने माखलेल्या खोबऱ्याच्या तुकड्यावर साकारली आहे. चैत्र यात्रेच्या भक्तीपूर्ण उत्सवामध्ये योगेश मोरे यांनी रेखाटलेले चित्र लाखो भाविकांच्या पसंतीस उतरले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
जोतिबाच्या नावानं चांगभल! गुलालाने माखलेला खोबऱ्याचा तुकडा, त्यावरच साकारला दख्खनचा राजा, Video
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement