एकीकडे 'जोतिबाच्या नावाने चांगभलं'चा गजर अन् डोंगरावर दक्षिण दरवाजाजवळ कोसळली वीज, 5 जण आश्चर्यकारक बचावले
- Published by:Sachin S
Last Updated:
जोतिबाच्या नावाने चांगभलं म्हणत आज लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले होते. एकीकडे भाविक जोतिबा मंदिरावर गुलाल खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण करत होते.
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापुरातील दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. या यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. भक्तांनी जोतिबा मंदिरावर गुलाल खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण केली. मानाच्या सासन काट्या घेऊन भाविक हलगीच्या तालावर थिरकत होते. पण, अशातच जोतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत ५ जण किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरूआहे.
advertisement
जोतिबाच्या नावाने चांगभलं म्हणत आज लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले होते. एकीकडे भाविक जोतिबा मंदिरावर गुलाल खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण करत होते. त्याचवेळी दक्षिण दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळली. त्यामुळे झाडाशेजारी उभे असणाऱ्या एका गाडी जवळील ५ जण किरकोळ जखमी झाले. पाचही जणांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं होतं. पाचही जण ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणाहून सात ते आठ फूट अंतरावर ही वीज कोसळली होती. इलेक्ट्रो मॅग्नेटिक फिल्डच्या संपर्कात आल्याने पाच जणांना किरकोळ दुखापत झाली,
advertisement
जखमी झालेल्यांची नावं
भीमराव पांडुरंग देसाई (वय 52 वर्ष )
राजाराम गुंडू पेडणेकर (वय 62)
पांडुरंग शंकर पेडणेकर (वय 43)
जयसिंग बाबुराव देसाई (वय 72)
प्रथमेश विनायक देसाई (वय 20)
शिवाजी धोंडीराम निकम (वय 47)
वरील सर्व जखमी झाले असून हे सर्वजण कागल तालुक्यातील अर्जुनी गावातले राहणारे होते. तर विठ्ठल लक्ष्मण केंगा हे चिमगावात राहणार आहे. जखमींना तातडीने छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात अर्थातच सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली किमान 12 तास त्यांना ठेवण्यात आलं आहे. या घटनेमुळे मात्र, भाविकांमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 9:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकीकडे 'जोतिबाच्या नावाने चांगभलं'चा गजर अन् डोंगरावर दक्षिण दरवाजाजवळ कोसळली वीज, 5 जण आश्चर्यकारक बचावले










