Mumbai Local Update : मुंबईकरांनो खुश व्हा! लोकलची गर्दी कमी होणार; रेल्वेने घेतला गेमचेंजर निर्णय
Last Updated:
Mumbai Local Update : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता प्रवाशांना येत्या काही दिवसांत दररोजच्या गर्दीतून सुटका मिळणार असून प्रवास आरामदायी होणार आहे.
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एप्रिल महिन्यापासून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि कमी त्रासदायक होण्याची अपेक्षा आहे. याचा नेमका फायदा प्रवाशांना कसा होणार हे सविस्तर जाणून घेऊया.
लोकल प्रवासाचा अनुभव बदलणार
घेतलेल्या निर्णयानुसार, 15 डब्यांच्या लोकलच्या 17 अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. या नव्या फेऱ्यांमुळे साधारण 45 हजार प्रवाशांना फायदा होणर आहे. विशेषतहा त्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याती अपेक्षा आहे.
दररोज कामासाठी बाहेर पडणाऱ्या आणि परत येणार्या प्रवाशांना लोकलच्या गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. 15 डब्यांच्या गाड्यांची संक्या वाढवल्याने अधिक प्रवासी सहजपणे प्रवास करु शकतील.
advertisement
शिवाय अंधेरी ते वांद्रे या महत्त्वाच्या मार्गावर दोन नवीन 15 डब्यांच्या गाड्या जोडण्यात आल्या आहेत. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात, त्यामुळे ही गाड्यांची वाढ करणं अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 10:50 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Update : मुंबईकरांनो खुश व्हा! लोकलची गर्दी कमी होणार; रेल्वेने घेतला गेमचेंजर निर्णय







