advertisement

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, 5 महिन्यानंतर PSI गोपाल बदने येणार तुरुंगाबाहेर, कोर्टाचा मोठा निर्णय

Last Updated:

फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे.

News18
News18
Phaltan Woman Death Case: सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून अटकेत असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

२३ ऑक्टोबर २०२५ रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांना घटनास्थळी एक धक्कादायक पुरावा सापडला होता. संबंधित महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी स्वतःच्या हातावर पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे लिहिली होती.
advertisement
"गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे," असा गंभीर आरोप त्या डॉक्टरने केला होता. या पुराव्याच्या आधारे फलटण पोलिसांनी गुन्हा दाखल करत पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना अटक केली होती.

न्यायालयात झालेला युक्तिवाद

अटकेनंतर गेल्या पाच महिन्यांपासून गोपाळ बदने कारागृहात होता. जामीनासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी दरम्यान सरकार पक्ष आणि बदने यांच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, न्यायालयाने काही अटी व शर्तींसह पीएसआय गोपाळ बदने याला जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला.
advertisement
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या गोपाळ बदने याला जामीन मिळाल्यामुळे आता खटल्याच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रशांत बनकर याच्यासह इतर बाबींचा तपासही पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, 5 महिन्यानंतर PSI गोपाल बदने येणार तुरुंगाबाहेर, कोर्टाचा मोठा निर्णय
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement