advertisement

थाटामाटात लग्न, अनैतिक संबंधामुळे मोडला हसता खेळता संसार, संभाजीनगरात नवविवाहितेनं संपवलं जीवन

Last Updated:

संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका नवविवाहित महिलेनं आयुष्याचा शेवट केला आहे.

kajal amol laghane
kajal amol laghane
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका नवविवाहित महिलेनं आयुष्याचा शेवट केला आहे. तिने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. पतीचे असलेले कथित अनैतिक संबंध आणि त्यातून होणारा सततचा मानसिक आणि शारीरिक छळ याला कंटाळून विवाहितेनं जीवन संपवलं आहे.
काजल अमोल लघाणे असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अमोल लघाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

एका वर्षात मोडला संसार

काजल हिचा विवाह २५ मार्च २०२५ रोजी अमोल लघाणे याच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. अमोल हा वारकरी संप्रदायातील असून कीर्तनामध्ये मृदंग वाजवणारा 'मृदंगाचार्य' म्हणून ओळखला जातो. संसाराला वर्ष पूर्ण झाले असतानाच काजलने १ एप्रिल २०२६ रोजी राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
advertisement

अनैतिक संबंध आणि छळाचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच अमोलचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे काजलच्या निदर्शनास आले होते. तिने या गोष्टीला विरोध केला असता, अमोलने तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. काजलला वारंवार शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे असे प्रकार सुरू झाले होते. या छळाबाबत काजलने आपल्या माहेरच्या लोकांनाही कल्पना दिली होती. मात्र, पतीच्या वागण्यात बदल झाला नाही, उलट छळ वाढतच गेला. अखेर या जाचाला कंटाळून तिने मृत्यूला कवटाळले.
advertisement

पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

काजलच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी रांजणगाव शेणपुंजी येथे धाव घेतली. आपल्या मुलीच्या मृत्यूला तिचा पती अमोल लघाणे हाच जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत असे क्रूर वर्तन केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
थाटामाटात लग्न, अनैतिक संबंधामुळे मोडला हसता खेळता संसार, संभाजीनगरात नवविवाहितेनं संपवलं जीवन
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement