advertisement

CIDCO : सिडकोतला भस्मासूर! पगाराचा आकडा सोडा, तब्बल पावणेदोनशे पट लूट, गोळा केलेली माया पाहून डोकं फिरंल

Last Updated:

Navi Mumbai : नवी मुंबईत सिडको अधिकारी सागर तापडिया याच्यावर उत्पन्नापेक्षा 173 क्के जास्त मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. लाचलुचपत विभागाने तपास करून खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून घराची झडती सुरू आहे.

सिडको अधिकाऱ्याच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
सिडको अधिकाऱ्याच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
नवी मुंबई : सिडकोतील प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी सागर तापडिया याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या चौकशीत त्याने आपल्या उत्तप्नाच्या तुलनेत खूप जास्त मालमत्ता जमा केल्याचे समोर आलेले आहे. या प्रकरणात खारघर पोलिस ठाण्याता त्याच्यासह त्याची पत्नी मनीशा तापडिया हिच्याविधोत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
लूटलं किती बघा
मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासाच तापडियाचे एकूण वेतन उत्पन्न हे 1 कोटी 12 लाख 17 हजार रुपये इतके आहे. पण त्याने त्याच्या पत्नीच्या नावावर 1 कोटी 42 लाख रुपयांची मालमत्ता खरेदी केलेली आहे. एवढेच नाही तर त्याने तब्बल 1 कोटी 64 लाख रुपयांहून अधिक खर्च केल्याचेही समोर आलेले आहे.
advertisement
खरं पाहिले तर या सर्व रकमेचा एकत्रित विचार केला तर तापडियाने 1 कोटी 94 लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जाम केल्याचे समोर आले आहे. ही रक्कम त्याच्ये पगाराच्या उत्पन्नापेक्षा तब्बल 173 टक्के जास्त आहे.
या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास अधिक तातडीने केला असून त्याच्या घराची झडतीही सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे शासकीय कार्यालयांमध्ये महागड्या गाड्यांमधून येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशा कारवायांमुळे भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
CIDCO : सिडकोतला भस्मासूर! पगाराचा आकडा सोडा, तब्बल पावणेदोनशे पट लूट, गोळा केलेली माया पाहून डोकं फिरंल
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement