advertisement

5 चुकांनी उद्ध्वस्त होईल आयुष्य, वॉरेन बफे यांनी दिली वॉर्निंग, तुम्ही तर कर नाही ना?

Last Updated:

वॉरेन बफे यांचा सल्ला मध्यमवर्गासाठी महत्त्वाचा, क्रेडिट कार्ड कर्ज, शॉर्टकट गुंतवणूक, मोठं घर, महागडी गाडी, जुगार लॉटरी टाळा, आधी बचत गुंतवणूक करा.

या 5 चुका तुम्हाला कायमचं करतील गरीब
या 5 चुका तुम्हाला कायमचं करतील गरीब
मिडल क्लास माणूस श्रीमंत होण्याची उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहातो, मात्र त्याचा पाच चुकांमुळे तो श्रीमंत होऊ शकत नाही किंवा अधोगतीला जातो. तुम्ही पगार आल्यानंतर या चुका करत असाल तर तुमच्यासाठी वॉरेन बफे यांनी वॉर्निंग दिली आहे. वॉरेन बफे हे नाव घेतलं की डोळ्यांसमोर येतो तो जगातील सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक असलेला चेहरा. पण तुम्हाला माहीत आहे का? अब्जावधीश असूनही ते एकदम साधे राहतात.
आपल्याला वाटतं की आर्थिक संकट अचानक येतं. पण बफे यांच्या मते, आर्थिक संकट हे आपण दुर्लक्षित केलेल्या छोट्या-छोट्या चुकांचा डोंगर असतो. जर तुम्हाला तुमची 'तिजोरी' भक्कम करायची असेल, तर बफे यांनी सांगितलेल्या या गोष्टींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
१. क्रेडिट कार्डचा अति वापर
आजकाल 'स्वाइप' करणं सोपं झालंय, पण त्याचं व्याज भरणं तितकंच कठीण. बफे म्हणतात, "जर तुम्ही १८ ते २४ टक्के व्याज भरत असाल, तर तुम्ही तुमची कमाई स्वतःच्या हाताने गमावत आहात." जगात असा कोणताही गुंतवणूकदार नाही जो दरवर्षी १८ टक्क्यांहून अधिक परताव्याची खात्री देऊ शकेल. मग आपण इतकं व्याज का भरायचं? कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचं महागडं कर्ज फेडा, हाच खरा नफा आहे.
advertisement
२. शॉर्टकटच्या नादात संयम गमावणे
बफे एक सुंदर उदाहरण देतात, आज जो वृक्ष आपल्याला सावली देतोय, तो अनेक वर्षांपूर्वी लावला गेला होता." झाड एका रात्रीत मोठं होत नाही, तशीच संपत्तीही एका रात्रीत वाढत नाही. मध्यमवर्गीय माणूस 'लवकर श्रीमंत' होण्याच्या नादात चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवतो. बफे यांचा साधा नियम आहे - आधी गुंतवणूक करा आणि मग जे उरेल त्यातून खर्च करा. आपण नेमकं उलटं करतो, आधी खर्च करतो आणि उरले तरच बचतीचा विचार करतो.
advertisement
३. गरजेपेक्षा जास्त मोठं घर
घर ही प्रत्येकाची गरज आहे, पण ते स्टेटस सिम्बॉल बनलं की डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. बफे आजही त्याच घरात राहतात जे त्यांनी दशकांपूर्वी घेतलं होतं. अनेकांना वाटतं की मोठं घर म्हणजे प्रगती, पण बफे यांच्या मते, जर तुमच्या कमाईचा मोठा हिस्सा फक्त घराच्या EMI मध्ये जात असेल, तर तुम्ही भविष्यात संपत्ती निर्माण करण्याच्या संधी कायमच्या गमावत आहात.
advertisement
४. नवी कोरी गाडी आणि स्टेटसचा सापळा
गाडी ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं साधन आहे, तुमची लायकी सिद्ध करण्याचं नाही. नवी कोरी गाडी शोरूममधून बाहेर पडताच तिची किंमत घसरते. अनेकजण कर्ज काढून महागडी गाडी घेतात आणि चक्रवाढ व्याजाच्या जाळ्यात अडकतात. बफे यांनी स्वतः अनेक वर्ष जुनी गाडी वापरली. त्यांचं म्हणणं आहे की, जो पैसा तुम्ही घसरत्या किमतीच्या वस्तूवर खर्च करता, तोच पैसा जर चांगल्या शेअर्समध्ये लावला असता, तर भविष्यात त्यातून अनेक गाड्या घेता आल्या असत्या.
advertisement
५. जुगार आणि लॉटरी
लॉटरीचं तिकीट किंवा झटपट पैसे मिळवून देणारे जुगाराचे प्रकार हे मध्यमवर्गीयांचे सर्वात मोठे शत्रू आहेत. बफे सांगतात की, नशिबाच्या जोरावर पैसा कमावण्याचा प्रयत्न नेहमीच तोट्यात नेतो. ती रक्कम छोटी वाटली तरी दीर्घकाळात तो वाया गेलेला पैसा असतो. त्याऐवजी तोच पैसा स्वतःच्या कौशल्यावर किंवा चांगल्या व्यवसायात गुंतवा, जो तुम्हाला आयुष्यभर परतावा देईल.
view comments
मराठी बातम्या/मनी/
5 चुकांनी उद्ध्वस्त होईल आयुष्य, वॉरेन बफे यांनी दिली वॉर्निंग, तुम्ही तर कर नाही ना?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement