advertisement

Bangladesh Cricket : आशिया कपची चाहूल अन् बांग्लादेश गुडघ्यावर! BCCI ला लिहिलं पत्र! काय मागणी केली?

Last Updated:

Bangladesh Cricket Board Write letter to BCCI : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआय आणि बीसीबी यांच्यातील दीर्घकाळच्या आणि मजबूत संबंधांचा हवाला देत बीसीसीआयला एक पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये संबंध सुधारण्यावर भर देण्यात आलाय.

Bangladesh Cricket Board Write letter to BCCI jay Shah
Bangladesh Cricket Board Write letter to BCCI jay Shah
India vs Bangladesh : बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतातून कडाडून विरोध करण्यात आला होता. याचाच परिणाम म्हणून आयपीएलमधून मुस्ताफिजूर रहमान याची हकालपट्टी करण्यात आली होती. कोलकाता नाईट रायडर्स संघाला याचा फटका बसला. अशातच आता बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारने देखील टोकाचा निर्णय घेतला अन् बांग्लादेश क्रिकेट संघाला भारतात खेळण्यापासून रोखलं. अशातच आता बांगलादेशने यु-टर्न घेतला असून आता बीसीबीने बीसीसीआयला पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

बांगलादेश दौऱ्याबाबतही एक विनंती

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआय आणि बीसीबी यांच्यातील दीर्घकाळच्या आणि मजबूत संबंधांचा हवाला देत बीसीसीआयला एक पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये संबंध सुधारण्यावर भर देण्यात आलाय. बीसीबीच्या या पत्रात भारतीय संघाच्या बांगलादेश दौऱ्याबाबतही एक विनंती करण्यात आल्याची माहिती समोर दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार आली आहे. टीम इंडिया गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये 3 एकदिवसीय आणि 3 टी-ट्वेंटी सामने खेळणार होता, परंतु बीसीसीआयने व्यस्त वेळापत्रकाचे कारण देत हा दौरा यावर्षी सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलला होता.
advertisement

बीसीबी अचानक का गुडघ्यावर आलं?

बीसीबी अचानक का गुडघ्यावर आलं? असा सवाल अनेकांना पडला होता. त्याचं कारण पुढच्या वर्षी होणारा आशिया कप.. पुढच्या वर्षी आशिया कप आयोजित करण्याची संधी बांगलादेशकडे आहे. ही संधी बांगलादेशला गमावायची नाही. बांगलादेशमध्ये जर टीम इंडियाने खेळण्यास नकार दिला तर हे सामने श्रीलंकेत पार पडतील. त्यामुळे बांगलादेशला बीसीसीआयसोबतचे संबंध ठीक करायचे आहेत.
advertisement

भारतात खेळण्यास नकार दिला पण...

युनूस सरकारच्या कार्यकाळात मे 2025 मध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डावर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आणि अमीनुल इस्लाम बुलबुल यांनी पदभार स्वीकारला. यांच्याच कार्यकाळात बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला आणि पाकिस्तानच्या साथीने स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. या संपूर्ण प्रकरणामुळे बांगलादेशलाच सर्वाधिक नुकसान सोसावं लागलं होतं. आता बांग्लादेश सरकारला पाकिस्तानची साथ सोडून गुडघ्यावर यावं लागलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Bangladesh Cricket : आशिया कपची चाहूल अन् बांग्लादेश गुडघ्यावर! BCCI ला लिहिलं पत्र! काय मागणी केली?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement